कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांचे स्वागत

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

मोहोळ : शाळेच्या पहिल्या दिवशी येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेत शाळेत येणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत तोरण बांधून व सनईच्या स्वरात हातात गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आल़े

Welcome to the girls school | कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांचे स्वागत

कन्या प्रशालेत विद्यार्थ्यांचे स्वागत

होळ : शाळेच्या पहिल्या दिवशी येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेत शाळेत येणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत तोरण बांधून व सनईच्या स्वरात हातात गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आल़े
शाळेच्या दारात भव्य रांगोळी काढण्यात आली होती़ शिवाय शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त बाल चमूच्या हाताने केक कापण्यात आला़ यावेळी मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आली़ यावेळी राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड, विस्तार अधिकारी हरीश राऊत, संस्थेच्या चेअरमन रंभादेवी गुंड, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, नफिसा शेख, अशोक पाचकुडवे, रमेश आदलिंगे, बाबू फाटे आदी उपस्थित होत़े

Web Title: Welcome to the girls school