शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 06:11 IST

अंतराळात प्रयोग करणारे शुभांशू पहिले भारतीय अंतराळवीर, ७ दिवस राहणार वैद्यकीय निरीक्षणाखाली, ‘गगनयान’ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा 

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १८ दिवस मुक्काम केल्यानंतर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीर ड्रॅगन ग्रेस यानाच्या सहाय्याने मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप दाखल झाले. वातावरणात दाखल झाल्यानंतर हे यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सॅन दिएगो किनाऱ्याजवळच्या समुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने उतरविण्यात आले. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयाण केलेले, तिथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या अनुभवांचा मोठा फायदा भारताच्या गगनयान मोहिमेला होईल.

‘ॲक्सिओम-४’ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले शुभांशू शुक्ला, मोहिमेच्या कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस्झ उझनांस्की-व्हिस्नेव्स्की, हंगेरीचे तिबोर कापूचार हे अंतराळवीर सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:५० वाजता ड्रॅगन ग्रेस या यानातून पृथ्वीवर येण्यास निघाले होते. 

अंतराळात शुभांशू यांनी केले हे प्रयोग

शुभांशू सातही मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोग व इतर नियोजित कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. यात टार्डिग्रेड्स, मायोजेनेसिस, मेथी-मूग अंकुरण, सायनाबॅक्टेरिया, मायक्रोअल्गी, पीक बियाणे आणि ‘वॉयेजर डिस्प्ले’ प्रयोगांचा समावेश आहे.

ऑक्सिऑम-४ या मोहिमेसाठी इस्रोने ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. २०२७मध्ये भारताच्या गगनयान मोहिमेद्वारे अंतराळयान प्रक्षेपित होणार आहे. त्याद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतरिक्षात नेण्यात येईल.

२२ तास २५ मिनिटांचा असा होता प्रवासदिवस पहिला I १४ जुलै दु. २.५०     : कॅप्सूलचा दरवाजा बंद केलादु. ४.3५     : कॅप्सूल आयएसएसपासून वेगळे झालेदु. ४.3५     : पहिले वेग नियंत्रणदु. ४.४०     : दुसरे वेग नियंत्रणसायं. ५.२८     : तिसरे वेग नियंत्रणसायं. ६.१५     : चाैथे वेग नियंत्रण

दिवस दुसरा I १५ जुलै दु. २.०७     : पृथ्वीच्या दिशेने परतीसाठी कक्षेबाहेर जाण्यासाठी इंजिन चालू दु. २.२६     : कॅप्सूलचा मागचा भाग (ट्रंक) वेगळा करण्यात आलादु. २.३०     : कॅप्सूलचे पुढचे कव्हर (नोजकोन) बंद करण्यात आलेदु. २.५७     : लहान पॅराशूट्स उघडलेदु. २.५८     : मुख्य पॅराशूट्स उघडलेदु. ३.००     : ड्रॅगन स्प्लॅशडाऊन (पाण्यावर यान अलगद उतरले.)

शुभांशु १७ ऑगस्टपर्यंत भारतात येणार : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, शुभांशु शुक्ला १७ ऑगस्टपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या मोहिमेनंतर शुभांशू काही गोष्टींमध्ये व्यग्र असणार आहेत. त्यांना सात दिवस डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांची चर्चा होणार आहे.

टॅग्स :NASAनासा