शहरं
Join us  
Trending Stories
1
आज साडेतीन कोटी मतदारांचा दिवस,'महा'मतदान करू, 'योग्य' सेवक निवडू; २,८६९ जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
2
आजचे राशीभविष्य, १५ जानेवारी २०२६: अचानक धनलाभ, अलौकिक अनुभूती; मान-सन्मानाचा दिवस
3
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज 'ईव्हीएम' बंद होणार; मुंबईत ठाकरे बंधू की भाजप-शिंदे याचा फैसला
4
शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी
5
मतदारांनो, घरबसल्याच शोधा मतदार यादीमध्ये नाव! निवडणूक आयोगाचे पोर्टल, मोबाइलवर सुविधा
6
उन्हाचा तडाखा अन् उकाडा... मतदानाला सकाळीच पडा बाहेर, मुंबईकर घामाघूम होण्याची शक्यता
7
मुंबईत मतमोजणीत अडचण आली तरच करणार 'पाडू' यंत्राचा वापर; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
8
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
9
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
10
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
11
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
12
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
13
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
14
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
15
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
16
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
17
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
18
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
19
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
20
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात विघ्न, सप्तपदी सुरू असतानाच उफाळलं गँगवॉर, बेछूट गोळीबार, २ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:49 IST

Punjab Crime News: लग्नसमारंभासाठी उपस्थित असलेल्या दोन गँगमधील गुंडांमध्ये ऐन सप्तपदीच्यावेळी काही कारणाने अचानक गँगवॉर उसळून झालेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे.

लग्नसमारंभासाठी उपस्थित असलेल्या दोन गँगमधील गुंडांमध्ये ऐन सप्तपदीच्यावेळी काही कारणाने अचानक गँगवॉर उसळून झालेल्या गोळीबारात २ जणांचा मृत्यू झाल्याची घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे. शनिवारी रात्री हा लग्न सोहळा असताना काही कारणावरून या दोन्ही गँगमधील गुंडांनी एकमेकांवर गोळीबार केला. त्यात २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहे. या घटनेनंतर लग्नस्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली. या गोळीबारात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार पंजाबमधील लुधियाना येथील पखोवार रोड येथे एक लग्नसोहळा होता. या लग्नाला दोन गँगचे लोक उपस्थित होते. यादरम्यान, दोन्ही गटांमध्ये काही कारणांवरून वाद झाला. त्यानंतर गोळीबारास सुरुवात झाली. या गोळीबारामध्ये २ जणांचा मृत्यू झाला. तर दोघेजण जखमी झाले, पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

मात्र गोळीबार करणाऱ्या व्यक्तींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हा लग्नसोहळा ज्या ठिकाणी सुरू होता. त्या हॉलमध्ये भांडी धुण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की,  रात्री सुमारे १ ते २ वाजेपर्यंत इथे पार्टी सुरू होती. त्यानंतर सप्तपदीची तयारी सुरू असतानाच गोळीबार झाला. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gang war erupts at wedding, two dead in Ludhiana

Web Summary : A gang war broke out during a wedding in Ludhiana, Punjab, leaving two dead and two injured. The shooting occurred amidst the ceremony, causing chaos. Police are investigating the incident, which happened between rival gangs.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारmarriageलग्नPunjabपंजाब