दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:09 IST2025-11-22T12:07:24+5:302025-11-22T12:09:13+5:30
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, चार आरोपींना अटक केली असून ही शस्त्रे पाकिस्तानातून ड्रोनद्वारे भारतात आणण्यात आली होती आणि पंजाबमार्गे कुख्यात गुंडांना पोहोचवण्याची योजना होती.

दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
दिल्लीपोलिसांच्या गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या चार संशयितांना अटक केली आहे, हे पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पाठवलेली अत्याधुनिक शस्त्रे कुख्यात गुंडांना देण्याच्या तयारीत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे पंजाबमार्गे भारतात आणण्यात आली होती आणि ती लॉरेश बिश्नोई, बंबीहा, गोगी आणि हिमांशू भाऊ टोळ्यांना पुरवण्यासाठी होती. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या हायटेक शस्त्रांचा समावेश आहे.
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
काही तस्कर शस्त्रास्त्रांचा मोठा साठा पोहोचवण्यासाठी दिल्लीत येणार आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर रोहिणी परिसरात सापळा रचण्यात आला आणि आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत. दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण नेटवर्कचा तपास सुरू केला आहे.
आरोपी उत्तर प्रदेश आणि पंजाबचे रहिवासी
अटक केलेले आरोपी पंजाब आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. दिल्लीतील रोहिणी परिसरातून शस्त्रांचा हा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. काही तस्कर दिल्लीत शस्त्रे आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर, पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.