शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

देशात मुदतीआधी लोकसभा निवडणूक होणार नाही- अमित शहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 23:19 IST

विरोधकांच्या एकजुटीवर अमित शहांचं टीकास्त्र

नवी दिल्ली: अविश्वास ठराव आणि राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची एकजूट दिसली, असा उपरोधिक टोला भाजपा अध्यक्ष अमित शहांनी लगावला आहे. कर्नाटकमध्ये एच. डी कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेते एकाच मंचावर दिसल्यानं विरोधकांच्या एकीची चर्चा सुरू झाली होती. यानंतर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव आणि राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीतही विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. यावर भाष्य करताना शहांनी विरोधकांना चिमटा दाखवला. यासोबतच देशात मुदतीआधी सार्वत्रिक निवडणूक होणार नाहीत, असंही ते म्हणाले. पुढील काही महिन्यात छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या तिन्ही राज्यात भाजपा सत्ता राखेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला. ते 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते. आम्ही तिन्ही राज्यातील निवडणुका जिंकू असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या कामांची आणि योजनांची माहिती दिली. देशात सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण नसल्याचा दावादेखील त्यांनी केला. सत्तेत आल्यापासून केलेल्या लोकोपयोगी कामांच्या जोरावर आम्ही मतदारांपर्यंत जाऊ, असं अमित शहा म्हणाले. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, असं देशातील जनतेला वाटतं, असंही त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणावरही थोडक्यात भाष्य केलं. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राफेल विमान खरेदी प्रकरणात सरकारची बाजू स्पष्ट केली आहे, असं शहांनी सांगितलं. ज्या लोकांकडे सध्या काही रोजगार उरलेला नाही, त्यांच्याकडे टीकेकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाLoksabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी