शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

आम्ही तिहेरी तलाक कायदा मानत नाही; ममता बॅनर्जींच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 7:31 PM

मंत्र्यांच्या विधानानं तृणमूल विरुद्ध भाजपा वाद पेटण्याची शक्यता

कोलकाता: तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारा कायदा देशभरात लागू झाला आहे. मात्र हा कायदा आपल्याला अमान्य असल्याचं ममता बॅनर्जींच्या मंत्र्यानं म्हटलं आहे. तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाल्याबद्दल मला दु:ख वाटतं. हा इस्लामवरील हल्ला आहे. त्यामुळे आम्ही तिहेरी तलाकवरील कायदा स्वीकारणार नाही, असं ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी म्हटलं. यावरुन मोठा राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालचे मंत्री असलेले सिद्दीकुल्लाह चौधरी जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष आहेत. तिहेरी तलाक कायद्याला स्पष्ट विरोध असल्याचं चौधरी म्हणाले. यावर केंद्रीय समितीची बैठक झाल्यास आम्ही पुढील कारवाईचा विचार करू, अशा शब्दांमध्ये त्यांनी पुढील भूमिका स्पष्ट केली. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरुन भाजपानं तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता चौधरी यांच्या विधानामुळे भाजपा अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.  मंगळवारी राज्यसभेत तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर झालं. यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. त्यामुळे देशभरात तिहेरी तलाकविरोधी कायदा लागू झाला. यामुळे आता तिहेरी तलाक दिल्यास तो गुन्हा समजला जाईल आणि तो देणाऱ्या व्यक्तीची रवानगी तुरुंगात होईल. तिहेरी तलाकला गंभीर गुन्हा मानण्याची तरतूद कायद्यात आहे. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा