शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

काँग्रेस Narendra Modi Stadium चं नाव बदलणार! जाहीरनाम्यात दिली मोठी आश्वासनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:22 IST

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांसाठी महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 चा (Gujarat Assembly Election 2022) बुगूल वाजला आहे. सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी कामाला लागले आहेत. यातच, काँग्रेसनेही गुजराती जनतेला आकर्षित करण्यासाठी आपला निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात सर्वसामान्यांसाठी महिलांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत अनेक मोठी आश्वासने दिली आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा सुरू आहे, ती नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलण्याची. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात आपले सरकार आल्यास आपण नरेंद्र मोदी स्टेडियमचे नाव बदलू आणि त्याला ​​सरदार पटेलांचे नाव देऊ, असे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

काँग्रेसने दिली ही मोठी आश्वासने - गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या आपल्या जाहीरनाम्यात काँग्रेसने, सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी पद्धत संपुष्टात येईल, 10 लाख सरकारी नोकऱ्या देण्यात येतील, बेरोजगारांना 3000 रुपये एवढा बेरोजगारी भत्ता देण्यात येईल. गॅस सिलिंडर ५०० रुपयांना मिळेल. 300 युनिट वीज मोफत दिली जाईल. तसेच, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाईल. प्रत्येक गुजराती व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिला जाईल, शेतकऱ्यांचे तीन लाखांचे कर्ज माफ केले जाईल. याच बरोबर, त्यांचे वीज बिलही माफ केले जाईल, अशी आश्वासने दिली आहेत.

शेतकऱ्यांसाठी काँग्रेसची आश्वासने - काँग्रेसने गुजरातमधील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी, पिकांना भाव देण्यासाठी 'भाव निर्धारण समिती' स्थापन करण्यात येईल, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल, गरजू विद्यार्थ्यांना 500 ते 20,000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल, अशी आश्वासने दिली आहेत.

दूध उत्पादकांना मिळेल सब्सिडी -गुजरात काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात, दूध उत्पादकांना 5 रुपये प्रति लिटर सब्सिडी मिळेल, असे आश्वासन दिले आहे. याच बरोबर, 4 लाख रुपयांची कोविड नुकसान भरपाई दिली जाईल. गेल्या 27 वर्षांत जो भ्रष्टाचार झाला, त्याची चौकशी होईल. अँटी करप्शन अॅक्ट आणून दोषींना कारागृहात पाठवले जाईल. मनरेगा योजनेसारखी शहरी रोजगार गॅरंटी योजना चलविली जाईल.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modi Stadiumनरेंद्र मोदी स्टेडियम