India-China War: आम्हाला गावी जायचेय! चीन युध्दापासून तरसले गावकरी; मागितली परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:17 IST2022-04-05T17:17:19+5:302022-04-05T17:17:37+5:30
India-China War 1962: चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जनजातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

India-China War: आम्हाला गावी जायचेय! चीन युध्दापासून तरसले गावकरी; मागितली परवानगी
भारत आणि चीनमध्येयुद्ध झालेल्या घटनेला आता सहा दशके लोटली आहेत. परंतू तेव्हा सीमेवरील गावांतून हलविण्यात आलेले गावकरी आज ना उद्या आपल्याला गावी जाता येईल या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. यासाठी त्यांनी केंद्र सरकार, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.
चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. चीनने आक्रमण केल्याने भारत सरकारने आणि सैन्याने ही गावे रिकामी केली होती. या लोकांना आपल्या घरांसह जमिनी सोडण्याचे आदेश लष्कराने दिले होते. तिथे भारतीय सैन्याला तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून हे गावकरी आपले गाव सोडून आजपर्यंत बगोरी आणि वीरपूरच्या डुंडा भागात राहत आहेत.
चीनसोबतचे युद्ध तर केव्हाच संपले होते. आज सहा दशके झाली तरी या गावकऱ्यांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी उत्तरकाशीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आम्हाला आमच्या गावी परत जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. तसेच आमच्या गावांना आदर्श गावाच्या रुपात विकसित करावे, असेही म्हटले आहे. तसेच दोन्ही गावांना भारत-चीन सीमेच्या अंतर्गत रेषेपासून आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्गापासून वेगळे करण्याची मागणी केली आहे.