'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:26 IST2025-04-23T13:21:58+5:302025-04-23T13:26:32+5:30

Pahalgam terrorist attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक मारले गेले. मृतांच्या नातेवाईकांची गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतली. 

'We want justice', relatives of the deceased burst into tears upon seeing Amit Shah | 'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध

'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध

Amit Shah Pahalgam terrorist attack: पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला आहे. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मंगळवारी रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचले. अमित शाह यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह सुरक्षा यंत्रणांची बैठक घेतली. अमित शाह यांनी मृतांच्या नातेवाईकांची श्रीनगरमध्ये भेट घेऊन सांत्वन केले. शाह यांना बघताच नातेवाईकांनी हात जोडले आणि ते हमसून हमसून रडू लागले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पहलगाम घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यातील नागरिकांचे मृतदेह श्रीनगर येथे आणण्यात आले. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यांनी मृतांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे भेट घेऊन सांत्वन केले. 

अमित शाहांना बघताच अश्रूंचा बांध फुटला

मृत पर्यटकांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भेट घेतली. अमित शाह समोर येताच मृतांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. सर आम्हाला न्याय हवा आहे, असा टाहो त्यांनी फोडला. अमित शाह यांनी सर्वांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. 

वाचा>>हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?

हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर अमित शाह पोहोचले काश्मीरमध्ये

२२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पहलगाममधील बैसरन घाटीमध्ये ही घटना घडली. दहशतवाद्यांनी निवडून निवडून पर्यटकांना गोळ्या घातल्या. तब्बल २६ लोकांची हत्या दहशतवाद्यांनी हत्या केली. यात १७ पर्यटक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमित शाह हे श्रीनगर पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अमित शाह यांनी ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे भेट दिली आणि घटनाक्रम जाणून घेतला. 

या हल्ल्याचा तपास आता एएनआयने सुरू केला असून, गुप्तचर यंत्रणांकडूनही अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे. चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर चौघांचा फोटोही समोर आला आहे. 

Web Title: 'We want justice', relatives of the deceased burst into tears upon seeing Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.