बिहारमधील विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोठ्या विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बिहार भाजप नेत्यांना अहंकारी होऊ नका असा सल्ला दिला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर अमित शहा यांनी बुधवारी दिल्लीतील भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बिहार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत पक्ष आणि आघाडीच्या भरघोस विजयावर चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना शाह सल्ला दिला. हा विजय सामूहिक विजय आहे. कोणीही अहंकार बाळगू नका असा सल्ला दिला.
गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता प्रत्येक विदेशी नागरिकाला..."
अमित शहा म्हणाले, निवडणुकीत सर्व नेत्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. निवडणुकीत एक टक्का योगदान देखील महत्त्वाचे आहे, परंतु कोणत्याही नेत्याने असा विचार करू नये की विजय त्यांच्यामुळेच झाला आहे. अशा विचारसरणीमुळे अहंकार निर्माण होतो."
शाह यांनी नेत्यांना सल्ला दिला
पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमधील आगामी निवडणुका लक्षात घेता, शहा यांनी बिहारच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना सांगितले की, प्रत्येकाने तयार राहावे आणि पक्षासाठी काम करण्यासाठी कोणालाही कुठेही पाठवता येईल. त्यांनी "जिथे कमी आहे, तिथे आपण आहोत" हा मंत्र दिला आणि सांगितले की जिथे संघटना कमकुवत आहे, तिथे आपण जाऊन ती मजबूत केली पाहिजे, असंही शाह म्हणाले.
बिहार निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. त्यांनी १०१ जागा लढवल्या आणि ८९ उमेदवार जिंकले. १०१ जागा लढवणारे जेडीयूचे ८५ उमेदवारही जिंकले. एनडीएने एकूण २०२ आमदार जिंकले.
Web Summary : Amit Shah cautioned Bihar BJP leaders against arrogance after their election victory. He emphasized collective effort and the importance of humility, advising them to prepare for upcoming elections in other states and strengthen the party at every level.
Web Summary : अमित शाह ने बिहार भाजपा नेताओं को जीत के बाद अहंकार से बचने की चेतावनी दी। उन्होंने सामूहिक प्रयास और विनम्रता पर जोर दिया, और अन्य राज्यों में आगामी चुनावों के लिए तैयार रहने की सलाह दी।