शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आजच्या काळात समान नागरी कायद्याची गरज; अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिपण्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 17:20 IST

अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कलम 44 च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेल स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

लखनऊः देशात पुन्हा एकदा समान नागरी संहिता(Uniform Civil Code)वर चर्चा सुरू झाली आहे. आज आंतरधर्मीय जोडप्यांनी मागितलेल्या संरक्षणाशी संबंधित 17 याचिकांवर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने समान नागरी संहिता देशासाठी आवश्यक असून केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी करावी, असे म्हटले आहे. 

अलाहाबाद उच्च न्यायालयानेकेंद्र सरकारला कलम 44 च्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेल स्थापन करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे. कलम 44 नुसार, भारतातील नागरिकांसाठी एकसमान नागरी संहिता किंवा समान नागरी संहिता(UCC) सुरक्षित करण्याचा सरकार प्रयत्न करेल. याचिकाकर्त्यांच्या विवाहांची तात्काळ नोंदणी करावी आणि धर्म परिवर्तनाबाबत सक्षम जिल्हा प्राधिकरणाच्या मान्यतेची वाट पाहू नये आणि झालेच तर नोंदणीसाठी आग्रह धरू नये, असेही न्यायालयाने या प्रकरणी विवाह निबंधकांना बजावले आहे.

आंतरधर्मीय जोडप्यांना गुन्हेगार समजू नये

न्यायालयाने पुढे म्हटले की, आजच्या काळात यूसीसी खूप महत्त्वाचे आहे आणि त्याची नितांत गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 75 वर्षांपूर्वी म्हटल्याप्रमाणे, अल्पसंख्याक समाजातील सदस्यांनी व्यक्त केलेली आशंका आणि भीती लक्षात घेऊन तो ऐच्छिक करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सुनीत कुमार म्हणाले की संसदेने 'सिंगल फॅमिली कोड' विचारात घेणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून आंतरधर्मीय जोडप्यांना संरक्षण मिळू शकेल आणि त्यांना गुन्हेगार म्हणून वागवले जाणार नाही.

विवाहासाठी प्राधिकरणाच्या मान्यतेची गरज नाहीदरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी सांगितले की, जिल्हा प्राधिकरणाच्या चौकशीशिवाय याचिकाकर्त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येणार नाही. यामागचे कारण सांगताना ते म्हणाले की, या लोकांनी लग्नापूर्वी धर्मांतर करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची आवश्यक मान्यता घेतलेली नाही. मात्र, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी स्पष्टपणे सांगितले की, आपला जोडीदार आणि धर्म निवडणे हा नागरिकांचा अधिकार आहे आणि धर्मांतर त्यांच्या इच्छेने झाले आहे. सरकार आणि कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे निवड, जीवन आणि स्वातंत्र्याच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होईल. विवाहापूर्वी धर्म परिवर्तन आणि जिल्हा प्राधिकरणाची मान्यता ही विवाह नोंदणीसाठी अनिवार्य अट नाही. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ