'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 13:10 IST2025-05-11T12:49:46+5:302025-05-11T13:10:01+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीची घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावर आता खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे विधान चर्चेत आले आहे.

'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
गेल्या दिवसापासून पाकिस्तान आणि भारतामध्ये तणाव निर्माण झाला आहे. दरम्या, काल या दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याची घोषणा केली. यात त्यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोघांनीही युद्धबंदीची घोषणा केल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावरही विधान केले.
आता यावर शिवसेना (ठाकरे गटाच्ये) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचे एक विधान समोर आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिल्यानंतर भारताला अमेरिका किंवा कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट काय केली?
काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मला अभिमान आहे की अमेरिका तुम्हाला या ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकला. जरी त्यावर चर्चा झालेली नसली तरी, मी या दोन्ही महान देशांसोबत व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे.
ट्रम्प यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, 'काश्मीरबाबत तोडगा निघू शकतो का हे पाहण्यासाठी मी दो्ही देशांसोबत काम करेन.' जर दोघांमध्ये शांतता प्रस्थापित झाली नसती तर लाखो लोक मृत्युमुखी पडले असते, असं यामध्ये म्हटले आहे.
दरम्यान, आता ठाकरे गटाच्या नेत्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मिडिया प्लॅफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी ट्रम्प यांच्याबाबत एक विधान केले. "कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाशिवाय भारताने आव्हानाचा सामना करावा यावर प्रियांका चतुर्वेदी यांनी भर दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, नियतीने आपल्याला ही जबाबदारी दिली आहे आणि भारताने या आव्हानाचा सामना केला पाहिजे.
प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, 'काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही.'
We don’t need a US intervention or of that of any other country to find a solution on Kashmir. Destiny has given us that responsibility and India must rise up to that challenge.
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) May 11, 2025
दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली
जम्मू आणि काश्मीरच्या मुद्द्यावर भारताने कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाला वारंवार नकार दिला आहे. हा प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे हे स्पष्टपणे सांगितले आहे. शनिवारी, भारतानेही शत्रुत्व संपवण्याच्या करारात अमेरिकेच्या भूमिकेला कमी लेखले आणि म्हटले की दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये करार झाला आहे.
"भारताने दहशतवादाविरुद्धची आपली भूमिका सातत्याने कायम ठेवली आहे.'भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यावर सहमती दर्शवली आहे. भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि अटल भूमिका कायम ठेवली आहे, असंही परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले.