कामगारांना कमी वेतन देण्याची चूक आम्ही केली - आयफोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 01:47 IST2020-12-20T01:46:07+5:302020-12-20T01:47:22+5:30
iPhone : पगार थकविल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी काही दिवसांपूर्वी विस्ट्रॉन कॉर्पच्या या प्रकल्पाची नासधूस केली होती.

कामगारांना कमी वेतन देण्याची चूक आम्ही केली - आयफोन
नरसापुरा : कामगारांना कमी वेतन देण्याची चूक आम्ही केली, अशी कबुली अॅपलच्या आयफोनचे भारतात उत्पादन करणाऱ्या तैवानच्या विस्ट्रॉन कॉर्प या कंपनीने दिली आहे. कर्नाटकमधील नरसापुरा येथे या कंपनीचा प्रकल्प असून, तेथील उपाध्यक्षाला हटविण्यात आले आहे.
पगार थकविल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी काही दिवसांपूर्वी विस्ट्रॉन कॉर्पच्या या प्रकल्पाची नासधूस केली होती.
सदर कंपनीच्या विदेशातील व्यवहारांची सारी सूत्रे या उपाध्यक्षाकडे होती. विस्ट्रॉन कॉर्पच्या नरसापुरा येथील कंपनीतले सर्व प्रश्न जोवर सोडविले जाणार नाहीत तोवर तिथे आयफोन बनविण्याची नवी कामे देणार नाही, असे अॅपलने जाहीर केले आहे.