शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

'तुमच्या फोनमध्ये तुम्ही काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे'; राहुल गांधींचा केंद्राला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 13:01 IST

Pegasus Phone Hacking Case : इस्रायलमधील पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतातील 300 पेक्षा जास्त लोकांचा फोन हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय.

ठळक मुद्दे 2018-2019 दरम्यान या पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले

नवी दिल्ली:काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इस्रायली सॉफ्टवेयर पेगासस(Pegasus)द्वारे केलेल्या गुप्तहेरीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे', अशा आशयाचे ट्विट करुन राहुल यांनी सरकारला टोला लगावला. रविवारी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे. 

पॅरिसमधील संघटना फॉरबिडेन स्टोरीज (Forbidden Stories) आणि एमनेस्टी इंटरनॅशनल (Amnesty International ) सह अनेक संघटनांनी तपास केला आहे. यात इस्रायलची कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर पेगाससचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच, ही फोन हॅकिंग केंद्र सरकारच्या सांण्यावरुन केल्याचा आरोपही करण्यात आलाय. या मुद्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधींसह अनेक विरोधी नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्विट करत केंद्र सरकारला टोला लगावला. 'तुम्ही तुमच्या फोनमध्ये काय वाचतात, हे आम्हाला माहित आहे', असे ट्विट राहुल यांनी केले. 

काय आहे पेगासस हॅकिंग वाद ?रविवारी रात्री एक रिपोर्ट समोर आली. यात दावा करण्यात येतोय की, इस्रायलमधील पेगासस सॉफ्टवेअरच्या मदतीने भारतातील 300 पेक्षा जास्त लोकांचा फोन हॅक करण्यात आला. यात पत्रकार, मंत्री, नेते, उद्योजग आणि इतर लोकांचा समावेश आहे. ही रिपोर्ट वॉशिंग्टन पोस्टसह 16 माध्यम कंपन्यांनी पब्लिश केली आहे. रिपोर्टच्या पहिल्या टप्प्यात 40 पत्रकारांचा समावेश आहे. दावा करण्यात येतोय की, 2018-2019 दरम्यान या पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले. यादरम्यान वॉट्सअॅप कॉल, फोन कॉल, रेकॉर्डिंग, लोकेशन इत्यादी महत्वाची माहिती घेण्यात आली. खुलासा करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की, ही रिपोर्ट अनेक टप्प्यात जाहीर केली जाणार आहे. येणाऱ्या टप्प्यात नेते, मंत्री आणि इतर व्यक्तींची नावे असू शकतात.

केंद्राचे स्पष्टीकरण रविवारी रात्री साडे नऊ वाजता ही रिपोर्ट समोर आली. यानंतर लगेच केंद्र सरकारने या रिपोर्टवर स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारने फोन हॅकिंग आणि यासंबंधी आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, या रिपोर्टला भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. आपला बचाव करताना सरकारने म्हटले की, भारताच्या लोकशाङीत प्रायवसी एक अधिकार आहे. ही रिपोर्ट पूर्णपणे खोटी आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा