शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पैलवानांची मोठी घोषणा! आता नव्या संसद भवनासमोर महिला 'महापंचायत', आंदोलक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 19:55 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत.

नवी दिल्ली : देशातील नामांकित पैलवान आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. सिंह यांनी महिला पैलवानांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करावी या मागणीसाठी पैलवान मागील एक महिन्यापासून आंदोलन करत आहेत. आज २३ मे रोजी या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला. ब्रीजभूषण यांनी महिला पैलवानांसह, महिला प्रशिक्षकांचा लैंगिक छळ केला असून त्यांना अटक करेपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पैलवानांची आहे. मंगळवारी पैलवानांनी इंडिया गेटवर कॅंडल मार्च काढून शांततेत निदर्शने केली. विविध राजकीय पक्षांसह संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. 

कॅंडल मार्चदरम्यान माध्यमांशी बोलताना विनेश फोगाटने आगामी काळातील रणनितीबाबत भाष्य केले. येत्या २८ मे रोजी नव्या संसद भवनासमोर महिला पंचायत होणार असून याचे नेतृत्व महिलाच करतील असे विनेशने सांगितले. "सर्वांनी निर्णय घेतला आहे की, २८ तारखेला नव्या संसद भवनासमोर महिला महापंचायत होणार आहे. आम्ही उठवलेला आवाज दूरपर्यंत जाणं गरजेचं आहे. आज आम्हाला न्याय मिळाला तर देशातील अन्य महिलांना आम्ही हिम्मत द्यायचा प्रयत्न करू", असंही फोगाटनं सांगितलं. 

मंगळवारी काढण्यात आलेल्या कॅंडल मार्चमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील हजेरी लावली. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनियाने आक्रमक पवित्रा घेत आमच्या बहिणींचा आदर आमच्यासाठी जीवापेक्षा जास्त असल्याचे म्हटले. याशिवाय जोपर्यंत देशातील मुलींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

आंदोलनाला एक महिना पूर्ण ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला आहे. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) माजी अध्यक्षांनी अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत. 

 

 

टॅग्स :Wrestlingकुस्तीNew Delhiनवी दिल्लीVinesh Phogatविनेश फोगटsexual harassmentलैंगिक छळBJPभाजपा