"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:51 IST2026-04-07T15:49:28+5:302026-04-07T15:51:16+5:30
"आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली, मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायलाच हवीत," असे सीमाने म्हटले आहे.

"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. हिंदू-मुस्लीम लोकसंख्येच्या मुद्द्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. यातच, आता पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरनेही या मुद्द्यावर भाष्य केले आहे. "आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली, मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायलाच हवीत," असे सीमाने म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाली सीमा हैदर? -
देशातील लोकसंख्या समतोलाच्या मुद्द्यावर झी न्यूजसी बोलताना सीमा म्हणाली, "प्रत्येक हिंदूला दोन ते तीन मुले असायलाच हवीत. सध्या देशातील लोकांची मानसिकता केवळ एक किंवा दोन मुलांना जन्म देण्याचीच आहे. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होत आहे. तर दुसऱ्य बाजूला, काही लोक ६ ते ८ मुले जन्माला घालून आपली लोकसंख्या वाढवत आहेत. यामुळे समाजात लोकसंख्या तफावत निर्माण होत आहे." स्वतःचे उदाहरणम देत सीमा म्हणाली, आम्ही देशाला ६ सनातनी मुले दिली आहेत. मात्र, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबात किमान ३ मुले असायला हवीत.
सीमाने नुकताच दिलाय सहाव्या मुलाला जन्म -
सीमा हैदर ही गेल्या तीन वर्षांपूर्वी नेपाळमार्गे पाकिस्तानातून ग्रेटर नोएडा येथे आली. ती सध्या रबुपुरा येथे सचिन मीनासोबत राहत आहे. भारतात येताना ती ४ मुलांसोबत आली होती, यानंतर, सचिनपासून तिला आणखी दोन मुले झाली. नुकताच सीमाच्या पाचव्या आणि सहाव्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचे वकील एपी सिंह यांनी या मुलांची 'भारती मीना' आणि 'भारत मीना' अशी ओळख करून दिली. सहाव्या मुलाच्या जन्मानंतर सीमा हैदर पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.