'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 12:49 IST2025-12-24T12:47:31+5:302025-12-24T12:49:32+5:30

व्हिडिओमध्ये ललित मोदी आणि विजय मल्ल्या एका पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ मल्ल्या यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील असल्याचे सांगितले जात आहे.

'We are the biggest fugitives in India', Lalit Modi and Vijay Mallya attack the government; Video goes viral | 'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल

'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल

फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ललित मोदी हसत स्वतःबद्दल आणि विजय मल्ल्याबद्दल विधान करत असल्याचे दिसत आहे.  यामध्ये ते "आम्ही दोघेही फरार आहोत"भारतातील दोन सर्वात मोठे फरार आहोत", असे बोलत असल्याचे दिसत आहे.

बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली

ललित मोदी यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टला एक  कॅप्शन दिली आहे. Let’s break the internet down in India again. Happy birthday my friend #vijaymallya Love u, असे यामध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये स्पष्टपणे भारत सरकार आणि तपास संस्थांवर टीका केली आहे. व्हिडिओमध्ये, दोन्ही व्यावसायिक पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर लोकांचा संताप उफाळून आला. वापरकर्त्यांनी याला भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेची थट्टा म्हटले. अनेक कमेंट्समध्ये असे म्हटले आहे की, "हे लोक भारत सरकारची किती मोठी थट्टा करत आहेत."

अनेकजण या व्हिडिओकडे भारताच्या तपास यंत्रणा आणि प्रत्यार्पण प्रक्रियेचे अपयश म्हणून पाहत आहेत. किंगफिशर एअरलाइन्सने ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज फेडल्यानंतर विजय मल्ल्या मार्च २०१६ मध्ये भारतातून ब्रिटनला पळून गेला. जानेवारी २०१९ मध्ये, त्याला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (PMLA) फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. त्याची प्रत्यार्पण प्रक्रिया सध्या ब्रिटनमध्ये प्रगतीपथावर आहे. 

काही दिवसापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला भारतात कधी परतणार असे विचारले आणि न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राशिवाय त्याच्या याचिकांवर सुनावणी होणार नाही असे सांगितले.

दुसरीकडे, ललित मोदी २०१० मध्ये आयपीएल मॅच फिक्सिंग, करचोरी, मनी लाँडरिंग आणि प्रॉक्सी मालकीशी संबंधित गंभीर आरोपांनंतर भारतातून पळून गेला. त्याच्यावर १२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचे आरोप आहेत.


Web Title : ललित मोदी, विजय माल्या ने वायरल वीडियो में सरकार का उड़ाया मजाक

Web Summary : ललित मोदी ने विजय माल्या के साथ एक वीडियो साझा किया, जिसमें खुद को भारत का सबसे बड़ा भगोड़ा बताया। वीडियो से आक्रोश फैल गया, लोगों ने भारतीय कानून और प्रत्यर्पण प्रक्रिया की आलोचना की। मोदी और माल्या दोनों पर भारत में गंभीर धोखाधड़ी के आरोप हैं और वर्तमान में विदेश में हैं।

Web Title : Lalit Modi, Vijay Mallya mock Indian government in viral video.

Web Summary : Lalit Modi shared a video with Vijay Mallya, calling themselves India's biggest fugitives. The video sparked outrage, with people criticizing the Indian law and the failed extradition process. Both Modi and Mallya face serious fraud charges in India and are currently abroad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.