शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 06:12 IST

शस्त्रसंधी झाल्याच्या घोषणेनंतर पत्रकार परिषदेतून केली पाकच्या दाव्यांची पोलखोल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. पाकिस्तानकडून पुन्हा कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असा थेट इशारा भारतीय लष्कराने शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर पाकिस्तानला शनिवारी सायंकाळी दिला. भूदलातील कर्नल सोफिया कुरेशी, हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग आणि नौदलातील कमांडर रघु आर. नायर हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

कमांडर रघु आर. नायर यांनी सांगितले की, जर पुन्हा हल्ला झाला तर भारत अतिशय कठोर कारवाई करेल. पाकिस्तानकडून पसरविण्यात येणाऱ्या खोट्या माहितीचा कर्नल सोफिया कुरेशी यांनी पर्दाफाश केला. त्यांनी सांगितले की, जे-एफ १७ या लढाऊ विमानांनी भारताचे एस-४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे तळ उ‌द्ध्वस्त केले अशी खोटी माहिती पसरवत आहे. पठाणकोट, जम्मू, भुज आणि सिरसा येथील हवाई तळांवर हल्ला केल्याचा दावादेखील खोटा आहे. चंदीगड आणि व्यास येथील आमच्या शस्त्रागारांवर हल्ल्याचा पाकिस्तानने दावा केला, पण ही ठिकाणेही संपूर्णपणे सुरक्षित आहेत.

गुरुद्वारावरील हल्ल्याचे आरोप भारताने फेटाळले

नानकाना साहिबा गुरुद्वारावरील ड्रोन हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानने केलेले आरोप शनिवारी भारताने फेटाळून लावले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत पाकने हे आरोप केले होते. मात्र, पाकचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे पीआयबी फॅक्ट चेक विभागाने स्पष्ट केले. भारतात जातीय द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रकारची सामग्री प्रसारित केली जात असल्याचे नमूद करत पाकने केलेले आणखी काही आरोप पीबीआयने फेटाळून लावले. ननकाना साहिबा हे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांचे जन्मस्थळ असून, येथील गुरुद्वारा शिखांसाठी एक पवित्र स्थळ आहे.

'भारतीय लष्कर उत्तम मूल्यांचा आदर करते'

कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, भारताने मशिर्दीना लक्ष्य केले अशीही अफवा पाकने पसरविली. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. त्या मूल्यांचा आमचे लष्कर आदर करते.

सहा एअरबेस उद्ध्वस्त

रावळपिंडी - नूर खान एअरबेसचकवाल - मुरीद एअरबेसशोरकोट - रफिकी एअरबेसपंजाब - रहीमयार खान एअरबेससियालकोट - सरगोधा एअरबेसइस्लामाबाद - चकलाला एअरबेस

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक