हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 05:59 IST2025-10-24T05:58:00+5:302025-10-24T05:59:22+5:30
केंद्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की, ग्लेशियर लेकची संख्या, क्षेत्रफळ वाढल्याने त्यांच्यापासून येणाऱ्या पुराचा धोकाही वाढतो.

हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : हवामान बदलामुळे हिमालयातील जलसाठ्यांत १४ वर्षांत ९.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने ऑगस्टच्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे. जलसाठ्यांचे एकूण क्षेत्रफळ २०११मध्ये ५.३० लाख हेक्टर होते. ते २०२५मध्ये ५.७९ लाख हेक्टर झाले आहे.
क्षेत्रफळ वाढलेल्या ग्लेशियर लेकची राज्यनिहाय यादी:
लडाख : १३३ , जम्मू-काश्मीर : ५०, हिमाचल प्रदेश : १३, उत्तराखंड : ७, सिक्कीम : ४४, अरुणाचल प्रदेश : १८१
पुराचा धोकाही वाढला
भारतामध्ये ग्लेशियर लेकमधील पाण्याचे क्षेत्रफळ २०११मध्ये १९९५ हेक्टर होते. ते २०२५ मध्ये २४४५ हेक्टर म्हणजे २२.५६ % वाढले आहे. केंद्रीय जल आयोगाने इशारा दिला आहे की, ग्लेशियर लेकची संख्या, क्षेत्रफळ वाढल्याने त्यांच्यापासून येणाऱ्या पुराचा धोकाही वाढतो. असे पूर कधी येतील याबद्दल अचूक अंदाज व्यक्त करणे शक्य नाही. त्यामुळे ग्लेशियर लेकच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे लागते.