शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला मोठं यश! वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत पारित, रात्री उशिरा झालं मतदान, विरोधी पक्षांना धक्का 

By बाळकृष्ण परब | Updated: April 3, 2025 02:30 IST

Waqf Board Amendment Bill: बुधवारी दिवसभर चाललेली वादळी चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले आरोप प्रत्यारोपांनंतर अखेरीस मध्यरात्र उलटल्यावर झालेल्या मतदानामधून वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात झालं.

बुधवारी दिवसभर चाललेली वादळी चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले आरोप प्रत्यारोपांनंतर अखेरीस मध्यरात्र उलटल्यावर झालेल्या मतदानामधून वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये पारित करण्यात झालं. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मतं पडली. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत पारित होणं हे केंद्रातील मोदी सरकारसाठी मोठं यश मानलं जात आहे. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्र सरकारसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या या विधेयकावरील मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनुपस्थित होते. त्यामुळे मतदानावेळची मोदींची अनुपस्थिती हा आता चर्चेचा विषय ठरली आहे. 

अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ सादर केले होते. त्यानंतर या विधेयकावर दिवसभर चर्चा झाली तसेच मध्यरात्रीनंतर मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला विरोधी पक्षांमधील सदस्यांनी विधेयकात सुचवलेल्या दुरुस्त्यांबाबत आवाजी मतदान झाले. यामध्ये दिवसभर चाललेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षांमधीन अनेक नेत्यांनी या विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या होत्या. या दुरुस्त्या लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने फेटाळून लाववण्यात आल्या. एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे गौरव गोगोई, इम्रान मसूद, राजीव रंजन यांच्यासह विरोधी पक्षांमधील इतर खासदारांनी विधेयकामध्ये दुरुस्त्या सूचवल्या होत्या. मात्र या दुरुस्त्या आवाजी मतदानाने फेटाळण्यात आल्या. 

त्यानंतर वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यामध्ये एकूण ५२० सदस्यांनी मतदान केले. यामध्ये या विधेयकाच्या बाजूने २८८  तर विरोधात २३२ एवढी मतं पडली. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाकडे स्वबळावर बहुमत नसल्याने तसेच हे सरकार मित्रपक्षांच्या आधाराने चालत असल्याने लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक पारित करून घेण्याचं आव्हान मोदी सरकारसमोर होतं. मात्र सरकारने लोकसभेत सहजपणे हे विधेयक पारित करून घेतलं. आता या विधेयकावर राज्यसभेमध्ये मतदान होणार असून, तिथे हे विधेयक पारित करून घेताना केंद्र सरकारची कसोटी लागणार आहे. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डlok sabhaलोकसभाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी