पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:37 IST2025-11-02T14:36:56+5:302025-11-02T14:37:27+5:30
Uttar Pradesh News: प्रत्येक पती आपल्या पत्नीला आपल्या ऐपतीनुसार सरप्राइज म्हणून काही ना काही देत असतो. अशाच एका पानवाल्याने पत्नीला सरप्राइज गिफ्ट देण्यासाठी जे काही केलं त्याबाबत ऐकल्यावर तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...
प्रत्येक पती आपल्या पत्नीला आपल्या ऐपतीनुसार सरप्राइज म्हणून काही ना काही देत असतो. अशाच एका पानवाल्याने पत्नीला सरप्राइज गिफ्ट देण्यासाठी जे काही केलं त्याबाबत ऐकल्यावर तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात एका ठिकाणी पान विक्रीचा व्यवसाय करणारा एक २२ वर्षीय तरुण पत्नीला सरप्राइज गिफ्ट देऊ इच्छित होता. त्यासाठी त्याने मेहनत करू पै पै जमवण्यास सुरुवात केली. त्याने वर्षभरात २० रुपयांची सुमारे १ लाख किमतीची नाणी जमवली. त्यानंतर ही नाणी घेऊन तो पत्नीसाठी चेन खरेदी करण्यासाठी तो सोनाराकडे गेला. जवळपास १ लाख रुपयांची नाणी पाहून सोनारही अवाक् झाला. सुरुवातीला त्याने आढेवेढे घेतले. मात्र नंतर ही नाणी न मोजताच या तरुणाला १ लाख रुपयांची चेन दिली.
सदर पतीचं नाव अभिषेक यादव असं असून, वर्षभरापूर्वी त्याचं लग्न झालं होतं. पत्नीला सोन्याची चेन भेट म्हणून द्यावी, अशी त्याची इच्छा होती. मात्र पत्नीने तशी मागणी कधी केली नव्हती. मात्र त्याला पत्नीच्या मनातील इच्छेची जाणीव होती. पण छोट्याशा दुकानामुळे त्याचं घर कसंबसं चालायचं. अशा परिस्थितीत महागडी सोन्याची चेन खरेदी करणे अभिषेक यादव याला परवडणारे नव्हते. त्यामुळे अभिषेक याने पत्नीला सरप्राइज द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी दुकानात येणारी २० रुपयांची नाणी बाजूला काढण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्याकडे १ लाख रुपयांची नाणी जमली.
अखेरीस ही सगळी नाणी घेऊन अभिषेक अहिरवां परिसरातील सराफा व्यावसायिक महेश वर्मा यांच्या दुकानात गेला. तिथे ही नाणी टेबलावर व्यवस्थित मांडून ‘’मला पत्नीला सोन्याची चेन भेट द्यायची आहे. त्यासाठी मी वर्षभरात ही एक लाख रुपयांची सोन्याची नाणी जमवली आहेत. मला १ लाख रुपये किमतीची चेन द्या, असे त्याने सोनाराला सांगितले. अभिषेकने आणलेली नाणी पाहून अवाक् झालेल्या सोनाराने सुरुवातीला ही नाणी घेण्यास नकार दिला. मात्र नंतर अभिषेकची खरी भावना पाहून सोनारही अवाक झाला. त्यानंतर सोनाराने ही नाणी स्वीकारत अभिषेक याला सोन्याची चेन दिली.