अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; आपनं सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:19 AM2024-02-19T11:19:18+5:302024-02-19T11:21:18+5:30

ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. 

wait for court order delhi cm arvind kejriwal skips ed sixth summon in aap liqour case | अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; आपनं सांगितलं कारण...

अरविंद केजरीवाल आजही ईडीसमोर हजर होणार नाहीत; आपनं सांगितलं कारण...

Arvind Kejriwal (Marathi News) नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल आजही  अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार नाहीत. ईडीने अरविंद केजरीवाल यांना सहावे समन्स पाठवले होते आणि त्यांना १९ फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी बोलावले होते. मात्र, ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे आपचे म्हणणे आहे.

आपने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'ईडीच्या समन्सच्या वैधतेचे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी ईडी स्वतः न्यायालयात गेली आहे. अशा परिस्थितीत ईडीने वारंवार समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.' दरम्यान, ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे. 

ईडीच्या तक्रारीत, अरविंद केजरीवाल जाणूनबुजून समन्सचे पालन करू इच्छित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, जर त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ सार्वजनिक अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन केले तर ते सामान्य माणसासाठी वाईट उदाहरण ठरेल, असेही ईडीने म्हटले आहे.

ईडीच्या याचिकेवर आज राऊज एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर राहू शकतात. तत्पूर्वी, या प्रकरणी १७ जानेवारी रोजी सुनावणी झाली होती, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहून पुढील न्यायालयाच्या तारखेला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ जानेवारी रोजी ठेवली होती.

Web Title: wait for court order delhi cm arvind kejriwal skips ed sixth summon in aap liqour case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.