वॅगन आर - रिक्षा समोरासमोर आदळल्या, चेंदामेंदा झाला; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 15:40 IST2023-03-28T15:39:09+5:302023-03-28T15:40:37+5:30
अपघात एवढा भयानक होता की मृतांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. मृतदेह रस्त्यावर विखुरलेले होते. पोलिसांनी धीर धरून मृतदेहांचे तुकडे एकत्र केले.

वॅगन आर - रिक्षा समोरासमोर आदळल्या, चेंदामेंदा झाला; भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. लखनऊ-हरदोई मार्गावर एका रिक्षा आणि मारुतीच्या वॅगन आर कारमध्ये टक्कर झाली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
अपघात एवढा भयानक होता की मृतांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते. मृतदेह रस्त्यावर विखुरलेले होते. पोलिसांनी धीर धरून मृतदेहांचे तुकडे एकत्र केले. लखनऊ-हरदोई मार्गावरील ट्रॉमा केअर सेंटरजवळच हा अपघात झाला. रिक्षा आणि कार समोरासमोर एकमेकांवर आदळले. यामध्ये वाहनांच्याही चिंधड्या उडाल्या आहेत. मृतांमध्ये दोन्ही गाड्यांतील व्यक्तींचा समावेश आहे.
जखमी झालेल्या लोकांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. मृतदेहाचे तुकडे १० ते १५ फुटांवर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिक्षकांपासून सर्व मोठे अधिकारी तिथे पोहोचले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत. एकाची ओळख पटलेली नसून पोलीस चौकशी करत आहेत.