पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 18:17 IST2025-09-09T17:43:40+5:302025-09-09T18:17:13+5:30
VP polls: राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत. तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत.

पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
संसदेत आज उपराष्ट्रपती पदासाठी मतदान पार पडले. सकाळी १० वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु होते. आता सायंकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. एनडीए की विरोधी पक्षाचा उमेदवार जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय नाट्यानंतर अचानक जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने ही उपराष्ट्रपती निवडणूक झाली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे उमेदवार आहेत. तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी हे उमेदवार आहेत. सत्ताधारी असल्याने राधाकृष्ण यांचे पारडे जड असले तरी क्रॉस व्होटिंगही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यातच काही पक्षांनी मतदान न केल्याने त्याचाही फटका बसण्याची शक्यता आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण मतदानाच्या ९६ टक्के मतदान झाले होते. वायएसआरपीने अचानक आपल्या खासदारांची मते एनडीएला देण्याचे जाहीर केले होते. यामुळे एनडीएची ११ मते वाढणार आहेत. मतदान सहा वाजता सुरु होणार असले तरी साडे सात- आठच्या सुमारास निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन्ही आघाड्यांचे नेते आपलाच उमेदवार जिंकणार असल्याचा दावा करत आहेत. भाजप प्रणित आघाडीला विजयाचा विश्वास असून त्यांनी सेलिब्रेशन डिनरची तयारी सुरु केली आहे.