आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 09:37 PM2021-01-24T21:37:58+5:302021-01-24T21:38:47+5:30

Digital Voter-ID Cards: निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे.

Voting ID card is now digital, voters will get online e-EPIC card | आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

googlenewsNext

नवी दिल्ली : मतदार ओळखपत्र आता डिजिटल झाले आहे. ते तुम्ही आपल्या मोबाइल, कम्प्यूटरवर डाऊनलोड करु शकणार आहात. निवडणूक आयोग सोमवारी म्हणजेच २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते ई-मतदार ओळखपत्र (Electronic Electoral Photo Identity Card) लाँच करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोग उद्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ई-मतदार ओळखपत्राचे e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) अॅपच्या माध्यमातून वाटप सुरू करणार आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद हे ई-ईपीआयसी कार्यक्रमाचा प्रारंभ करतील आणि पाच नवीन मतदारांना ई-ईपीआयसी आणि मतदार ओळखपत्र प्रदान करतील. 

दरम्यान, निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. याचे औचित्य साधून निवडणूक आयोगाकडून २०११ या वर्षापासून दरवर्षी २५ जानेवारीला 'राष्ट्रीय मतदार दिन' साजरा करण्यात येतो. 

e-EPIC म्हणजे काय?
e-EPIC एक इडिट न करता येण्यासारखा सुरक्षित पोर्टेबल दस्तऐवज स्वरूप (पीडीएफ) आवृत्ती आहे. यात सिक्युरिटी क्यूआर कोड असेल. ज्यात फोटो आणि अनुक्रमांक, भाग क्रमांक इ. असेल. तुम्ही मोबाइल किंवा संगणकावर वर ई-ईपीआयसी कार्ड डाउनलोड करू शकता. तसेच,  हे कार्ड संगणक आणि डिजिटल संग्रहित केले जाऊ शकते. या सुविधेद्वारे मतदार कोठूनही ऑनलाइन मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकतील.

ई-मतदार ओळखपत्र असे करता येणार
- सर्व प्रथम https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in/account/login या संकेतस्थळाला भेट द्या. 
यानंतर तुम्हाला लॉग-इन करावे लागेल. जर तुमचे अकाऊंट नसेल तर मोबाइल नंबरच्या मदतीने तुम्ही अकाऊंट सुरू करु शकता.
- वेबसाईटवर लॉग-इन केल्यावर Download e-EPIC या टॅबवर क्लिक करा.
- २५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.१४ नंतर तुम्ही वोटर आयडी डाऊनलोड करु शकणार आहात.

Web Title: Voting ID card is now digital, voters will get online e-EPIC card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.