Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
By संतोष कनमुसे | Updated: December 5, 2025 15:25 IST2025-12-05T15:08:46+5:302025-12-05T15:25:03+5:30
Vladimir Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दिल्लीत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. आज, ते २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा केली.

Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
Vladimir Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. गुरुवारी दिल्लीत आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. आज, ते २३ व्या भारत-रशिया शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाच्या करारांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर, दोन्ही बाजूंनी संयुक्त निवेदनात संबंध मजबूत करण्याचा आणि दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे लढण्याचा संकल्प व्यक्त केला.
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत आणि रशियामधील मैत्री ही ध्रुवताऱ्यासारखी आहे. गेल्या आठ दशकांत अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मानवजातीने अनेक आव्हाने आणि संकटांना तोंड दिले आहे.
महत्त्वाच्या खनिजांबाबत सहकार्य खूप महत्वाचे आहे. भारत सुरुवातीपासूनच युक्रेन मुद्द्यावर शांततेच्या बाजूने आहे,असंही मोदी म्हणाले. यावेळी पीएम मोदी यांनी रशियन नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. रशियन नागरिकांना मोफत ई-टूरिस्ट व्हिसा देणार असल्याची घोषणा मोदींनी केली. दहशतवाद हा मानवतेच्या मूल्यांवर हल्ला आहे आणि रशिया आणि भारत एकत्रितपणे त्याविरुद्ध लढतील, असंही मोदी म्हणाले.
यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीही इंधनाबाबत मोठी घोषणा केली. पुतिन म्हणाले की, रशिया कोणत्याही दबावाशिवाय भारताला इंधन पुरवठा करत राहील. रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांच्या प्रत्येक पैलूवर चर्चा केली आहे. सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि संस्कृती या क्षेत्रात आमचे संबंध सतत मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असंही पुतिन म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारत-रशिया आर्थिक भागीदारीला नवीन उंचीवर नेणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही २०३० पर्यंत भारत-रशिया आर्थिक सहकार्य कार्यक्रम सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. भारत आणि रशिया युरेशियन आर्थिक संघासोबत मुक्त व्यापार करार (FTA) लवकर पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत."
भारत आणि रशिया यांच्यातील महत्त्वाचे करार कोणते आहेत?
- दोन्ही देशांनी स्थलांतर आणि हालचाली सुलभ करण्याबाबत करारावर स्वाक्षरी केली. यामुळे रोजगार किंवा व्यवसायासाठी एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करणे सोपे होईल.
- आरोग्य आणि अन्न सुरक्षा या क्षेत्रातील सहकार्याबाबत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
#WATCH | Delhi | Russian President Vladimir Putin says, "We are ready to continue uninterrupted shipments of fuel for the growing Indian economy..."
— ANI (@ANI) December 5, 2025
(Video source: DD) pic.twitter.com/D77wUA76Fa