YSRCP खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण, पोलिसांनी काही तासातच केली सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 11:35 IST2023-06-16T11:34:07+5:302023-06-16T11:35:06+5:30

आरोपींनी पैशासाठी खासदाराच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचे समोर येत आहे.

Visakhapatnam MP mp mvv satyanarayana's wife and son allegedly kidnapped in andhra pardesh | YSRCP खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण, पोलिसांनी काही तासातच केली सुटका 

YSRCP खासदाराच्या पत्नी आणि मुलाचे अपहरण, पोलिसांनी काही तासातच केली सुटका 

आंध्र प्रदेशमध्ये सत्ताधारी पक्ष वायएसआरसीपीच्या (YSRCP) खासदाराची पत्नी आणि मुलासह तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासातच तिघांचीही सुटका केली. तसेच, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींची चौकशी केली जात आहे. आरोपींनी पैशासाठी खासदाराच्या कुटुंबीयांचे अपहरण केल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार एमव्हीव्ही सत्यनारायण यांच्या पत्नी आणि मुलाचे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून अपहरण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपहरणकर्त्यांची माहिती तात्काळ गोळा केली. तसेच, पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून काही तासांत तिघांचीही सुटका केली.

गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत तिघांचीही सुटका आली आहे. आतापर्यंत या घटनेतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तसेच,  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदाराच्या कुटुंबीयांच्या अपहरणामागे पैशाचा हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. इतर कोणताही हेतू आतापर्यंत समोर आलेला नाही.

Web Title: Visakhapatnam MP mp mvv satyanarayana's wife and son allegedly kidnapped in andhra pardesh