शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

मुलांना धमकावून नाही शिकवलं जाऊ शकत, रडणा-या चिमुरडीचा व्हिडीओ पाहून विराट कोहलीही कळवळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 4:38 PM

सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अत्यंत वाईट पद्धतीनं या चिमुरडीवर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवताना दिसत आहे. संताप आणणारा असा हा व्हिडीओ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत राग व्यक्त केला आहे. 

नवी दिल्ली, दि. 19 - सोशल मीडियावर सध्या एका लहान मुलीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला अत्यंत वाईट पद्धतीनं या चिमुरडीवर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवताना दिसत आहे. संताप आणणारा असा हा व्हिडीओ टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनंदेखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत राग व्यक्त केला आहे. 

महिलेच्या अमानुष वागणुकीमुळे कळवळून रडणारी या चिमुरडीचा व्हिडीओ कुणीही पाहिला तर त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. असा हा त्रासदायक व्हिडीओ विराटनं सोशल मीडियावर  शेअर करत म्हटले आहे की, ''खरं तर आपण या मुलीच्या वेदनांकडे दुर्लक्ष करत आहोत. मुलांना शिकवताना आपण इतक्या अहंकारात बुडालो आहोत की आपल्याला त्या बाळाच्या वेदनादेखील दिसेनाशा झाल्या आहेत. अशा अमानुष प्रकारे एखाद्या मुलाला शिकवण्याची पद्धत पाहून मी दुःखी झालो आहे''. ''एका लहान मुलाला कधीही धमकावून शिकवल्यास तो काहीही शिकत नाही, अत्यंत दुःखदायक'', अशा शब्दांत विराटनं या चिमुरडीच्या व्हायरल व्हिडीओबाबत दुःख व्यक्त केले आहे.  

दरम्यान, विराट कोहली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. कोणत्या-न्-कोणत्या सामाजिक मुद्यावर तो आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेहमी मांडताना, त्याविरोधात आवाज उठवताना पाहायला मिळतो.  

 

काय आहे व्हिडीओमध्ये ?या व्हिडीओमध्ये एक महिला जवळपास 3 ते 4 वर्षांच्या चिमुरडीला अत्यंत अमानुष वागणूक देत आहे. अत्यंत वाईट पद्धतीनं ही महिला तिच्यावर ओरडून, मारझोड करुन तिला शिकवत आहे. तिच्या या वागणुकीनं हैराण झालेली ही मुलगी अक्षरशः कळवळून रडत आहे. रडत रडतच ती त्या महिलेला विनंतीही करत आहे की, प्रेमानं बोलशील का, माझा कान आणि डोके दोन्ही खूप दुखू लागले आहे. पण तरीही या महिलेनं तिचा छळ काही थांबवला नाही. उलट तिच्यावर आणखीच ओरडू लागली. मनाला पिळवटून टाकणार असा हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर केला जात असून या महिलेच्या वागणुकीवर सर्वच जण संताप व्यक्त करत आहेत.