लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 12:00 PM2017-08-15T12:00:02+5:302017-08-15T12:40:19+5:30

कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं.

team india kandy hoist the indian flag | लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

लंका'दहन' केल्यानंतर विराट ब्रिगेडने कॅन्डीत फडकावला झेंडा

ठळक मुद्देकसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते.

कॅन्डी, दि. 15 - कसोटी मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने धुळ चारल्यानंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहुर्तावर श्रीलंकेत ध्वजारोहण केलं. कॅंडीमध्ये देशाचा झेंडा फडकावून संघातील सदस्यांनी राष्ट्रगीत गायलं. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. बीसीसीआयने ध्वजारोहणाचा व्हिडीओ जारी केला आहे. 

एक दिवसापूर्वीच टीम इंडियाने 85 वर्षांनंतर पहिल्यांदा विदेशी धरतीवर व्हाइटवॉश देऊन भारतीयांना स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं होतं. पल्लेकल कसोटीत  श्रीलंकेचा दुसरा डाव 181 धावांत गुंडाळून एक डाव आणि 171 धावांनी विजय साजरा केला. या विजयासोबत भारताने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाइटवॉश दिला. यासोबत कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला. विदेशी धरतीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला. 


विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेत रचला इतिहास-
विदेशी धरतीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने 3-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. 1932 सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी भारताचं कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.   
विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने 2000मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 ने, तर 2004 व 2010 मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.
सलग मालिका विजयाच्या वर्ल्ड रेकॉर्डपासून एक पाऊल दूर-
भारतीय टीम सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड ऑस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग 9 मालिका विजय मिळवले होते. यापूर्वी भारताने 2008 आणि 2010 च्या दौ-यात अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग या तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली 5 सलग विजय मिळवले होते.  
टेस्ट क्रिकेटमध्ये सलग मालिका विजयात कोण पुढे-
 -ऑस्ट्रेलिया -9 (2005/06-2008)
 -भारत- 8 (2015- 2017)
 -इंग्लंड -8 (1884-1892)
 -ऑस्ट्रेलिया -7 (1945/46-1951/52)
 -ऑस्ट्रेलिया -7 (1956/57-1961)
 -वेस्टइंडीज-7 (1982/83-1985/86)
 -ऑस्ट्रेलिया- 7 (2001/02-2003/04) 

आणखी वाचा
Independence Day 2017 : देशभरात उत्साहात साजरा होतोय स्वातंत्र्यदिन
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण न ठरता ‘पिकनिक डे’ ठरू लागले आहेत - उद्धव ठाकरे

Web Title: team india kandy hoist the indian flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.