Viral Video: घराबाहेर खेळत होती चिमुकली, तितक्यात नंबर प्लेट नसलेली कार आली अन्...; व्हिडिओ पाहून धडकी भरेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:01 IST2025-10-30T15:00:44+5:302025-10-30T15:01:51+5:30
Teen Driving Car Almost Crushes 3-Year-Old Girl: घराबाहेर खेळणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावरून कार घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

Viral Video: घराबाहेर खेळत होती चिमुकली, तितक्यात नंबर प्लेट नसलेली कार आली अन्...; व्हिडिओ पाहून धडकी भरेल!
गुजरातच्याअहमदाबाद येथील नोबलनगर भागात बुधवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका अल्पवयीन चालकाने घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुलीच्या अंगावर कार घातली. सुदैवाने, या अपघातातून मुलगी थोडक्यात बचावली. ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुलगी घराबाहेर खेळत होती, त्याचवेळी, एक नंबर प्लेट नसलेली कार तिथे येते. चालकाचे मुलीकडे लक्ष जात नाही आणि तो कार थेट तिच्या अंगावर घालतो. जवळ असलेल्या लोकांनी आरडाओरड करताच चालक कार थांबवतो. सुदैवाने, या घटनेत मुलीला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, मुलगी चमत्कारिकरित्या कारखालून सुरक्षितपणे बाहेर पडताना आणि उभी राहताना दिसत आहे.
A minor boy ran over a three-year-old girl with a car in #Gujarat's #Ahmedabad. The incident was recorded on camera, and the disturbing video surfaced online. The girl miraculously escaped unhurt.#India
— ⚡️🌎 World News 🌐⚡️ (@ferozwala) October 30, 2025
The incident reportedly took place at Shiv Bungalows when the girl was… pic.twitter.com/Wyu8XUlHRx
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, अहमदाबाद पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेतली आहे. अहमदाबाद पोलिसांनी त्वरित कारवाई करत अल्पवयीन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बीएनएस कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १७७, १८४, १८१ अंतर्गत ‘जी’ विभाग वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या घटनेमुळे पालकांमध्ये भिती पसरली आहे.