सोशल मीडियावर कधीकधी असे व्हिडीओ समोर येतात जे लोकांना मोठा धक्का देतात. छत्तीसगडमधील बलरामपूर येथील असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षक मुलांना इंग्रजी शिकवताना दिसत आहे, परंतु ते चुकीचं इंग्रजी शिकवत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
शिक्षक मुलांना नाक, कान आणि डोळे हे शब्द उच्चारायला शिकवताना स्पष्टपणे दिसत आहे, परंतु तो चुकीचे शब्द उच्चारतो. तसंच मुलांना चुकीचं स्पेलिंग शिकवतो. Noge, Eare आणि Iey अशी नाक, कान आणि डोळे याची स्पेलिंग असल्याचं सांगतो. सातत्याने तो चुकीचं शिकवत असल्याचं दिसतं. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक संतापले कारण याचा संबंध मुलांच्या शिक्षणाशी आहे.
लहान मुलं चुकीचं शिकत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, शिक्षण विभागाने ताबडतोब कारवाई केली. अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. विभागाने शिक्षकाला नोटीस बजावली आणि नंतर त्याला निलंबित केलं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांचा पाया शाळेतच रचला जातो आणि जर तिथे चुका झाल्या तर ते पुढे कसं चांगलं शिक्षण घेतील? असा प्रश्न पडतो. सोशल मीडियावर अनेक लोक शिक्षकांच्या कृतीवर टीका करत आहेत, तर काही जण असेही म्हणत आहेत की मुलांना योग्य ज्ञान मिळावं म्हणून शिक्षकांना वेळोवेळी प्रशिक्षण देणं महत्त्वाचं आहे.
Web Summary : A teacher in Chhattisgarh is suspended after a video surfaced showing him teaching incorrect English to students. He was teaching wrong spellings for nose, ear and eye. The education department took swift action following public outrage, emphasizing no compromise on education quality.
Web Summary : छत्तीसगढ़ में एक शिक्षक को छात्रों को गलत अंग्रेजी सिखाने के बाद निलंबित कर दिया गया। वीडियो में वह नाक, कान और आंख की गलत वर्तनी सिखा रहा था। जनता के आक्रोश के बाद शिक्षा विभाग ने त्वरित कार्रवाई की, शिक्षा की गुणवत्ता पर कोई समझौता नहीं करने पर जोर दिया।