Video: स्टेज पडले, राहुल गांधी पडता पडता वाचले, सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 12:31 IST2024-05-28T12:26:43+5:302024-05-28T12:31:32+5:30

'तरुणांना नोकरी मिळेल फटाफट, फटाफट', तेजस्वी यादव सभेत म्हणाले.

Viral Video: Stage fell, Rahul Gandhi survived the fall, security guards rushed to his aid! | Video: स्टेज पडले, राहुल गांधी पडता पडता वाचले, सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावले!

Video: स्टेज पडले, राहुल गांधी पडता पडता वाचले, सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला धावले!

लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी सोमवारी बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी निवडणूक रॅलीसाठी बांधलेल्या स्टेजचा काही भाग कोसळला असता मीसा भारती यांनी राहुल गांधीचा हात धरून त्यांना सावरले. यावेळीही राहुल गांधी हसत लोकांना अभिवादन करत होते. स्टेजचा काही भाग कोसळला असता मीसा भारती यांनी राहुल गांधी यांना सावरले. सुरक्षारक्षक त्यांच्या मदतीला आले असता मी ठीक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, निवडणुकीच्या भाषणादरम्यान तेजस्वी यादव म्हणाले की, नोकरी मिळेल फटाफट, फटाफट...लाखो रुपये बहिणींच्या खात्यात पैसे  जातील खटाखट खटाखट खटाखट. त्यांच्या या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी स्मितहास्य केले.

Web Title: Viral Video: Stage fell, Rahul Gandhi survived the fall, security guards rushed to his aid!