हृदयद्रावक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचता नाचता मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 11:30 IST2022-11-30T11:28:08+5:302022-11-30T11:30:00+5:30

उत्साहात नाचणाऱ्या मनोज यांचा अचानक तोल गेला. ते खाली कोसळले. मनोज जमिनीवर पडताच त्यांच्या आसपास असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला.

viral video of an died due to heart attack during dancing in wedding varanasi | हृदयद्रावक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचता नाचता मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय घडलं?

हृदयद्रावक! लग्न सोहळ्यात विपरित घडलं, नाचता नाचता मृत्यूने गाठलं अन्...; नेमकं काय घडलं?

वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्न सोहळ्यात नाचता नाचता एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती आपल्या नातेवाईकांसोबत नाचताना दिसत आहे. नाचता नाचता अचानक ते खाली कोसळतात. बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेने एक खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या पिपलानी कटरा औघडनाथ जवळ 25 ऑक्टोबरला एक लग्न होतं. त्यात 40 वर्षीय मनोज विश्वकर्मा नातेवाईकांसोबत नाचत होते. उत्साहात नाचणाऱ्या मनोज यांचा अचानक तोल गेला. ते खाली कोसळले. मनोज जमिनीवर पडताच त्यांच्या आसपास असणाऱ्या महिलांनी आरडाओरडा केला. मनोज यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं.

मनोज यांना तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. डॉक्टरांनी मनोज यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं. मनोज यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काही तासांपूर्वी सोबत असलेले, उत्साहात नाचणारे मनोज आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणं अनेकांना जड जात आहे.

नाचता नाचता मृत्यू झाल्याच्या याआधी,अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.  काही दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये एका लग्न सोहळ्यात स्टेजवर नाचणाऱ्या एका तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तर सप्टेंबरमध्ये जम्मूतील एक व्हिडीओ समोर आला होता. यात पार्वती मातेची भूमिका साकारणाऱ्या 20 वर्षीय कलाकाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: viral video of an died due to heart attack during dancing in wedding varanasi