Video: सोफ्यावरुन उठताच कंबरेला लावलेल्या बंदुकीतून गोळी सुटली; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 19:13 IST2025-12-31T19:12:54+5:302025-12-31T19:13:55+5:30
Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: सोफ्यावरुन उठताच कंबरेला लावलेल्या बंदुकीतून गोळी सुटली; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Viral Video: एखाद्याला मृत्यू कधी, कसा आणि कुठे गाठेल, काही सांगता येत नाही. पंजाबमधून अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाइकाच्या घरी आलेल्या एका एनआरआय तरुणाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पाहून तुम्हीही चक्रावून जाल.
कसा घडला अपघात?
ही घटना पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात घडली. मृत तरुणाचे नाव हरपिंदर सिंह ऊर्फ सोनू असून तो NRI होता. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, संबंधित तरुण नातेवाइकांच्या घरी येतो. सर्वांशी हसत-खेळत बोलल्यानंतर तो सोफ्यावर बसतो. पण, उठताना त्याच्या कंबरेला लावलेल्या लोडेड बंदुकीतून अचानक गोळी सुटते अन् पोटात घुसते. गोळी लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला बठिंडा येथे रेफर करण्यात आले. दुर्दैवाने, वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
🚨पंजाब में फाजिल्का के अबोहर में एनआरआई की लोडेड पिस्टल कमर में लगी थी। घर में रिश्तेदारों के साथ बैठा था।
— JIMMY (@Jimmyy__02) December 31, 2025
जैसे ही सोफे से उठा, पिस्टल चल गई। गोली पेट में लगी। अस्पताल में मौत हो गई। एनआरआई हरपिंदर सिंह कुछ दिन पहले लौटा था, दो साल की बेटी है। pic.twitter.com/j5uEtPMccy
सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडिओ @Jimmyy__02 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून हळहळ व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले, आयुष्याचा काही भरोसा नाही, मृत्यू कधीही समोर येऊ शकतो. दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली, मृत्यू येताना वेळ आणि जागा पाहत नाही. तर, आणखी एका युजरने लिहिले, मृत्यू कोणत्याही कारणाने येऊ शकतो, म्हणून जपून रहा. दरम्यान, हा व्हिडिओ केवळ एक अपघात दाखवत नाही, तर हत्यारांबाबत निष्काळजीपणा किती घातक ठरू शकतो, याचे धक्कादायक उदाहरणही आहे.