Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:17 IST2025-08-11T09:16:57+5:302025-08-11T09:17:15+5:30

पती-पत्नीच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, आता चक्क हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Viral Video: High voltage drama on the road! Wife slaps husband in the ear, what started the argument? | Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?

Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?

पती-पत्नीच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात समोर आला आहे. या ठिकाणी एका महिलेने आपल्या पतीला भर रस्त्यात बेदम मारहाण केली. पतीने आपला मोबाईल तोडल्याने संतापलेल्या महिलेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

ललितपूरमधील कोतवाली सदर भागातील इलाईट चौकाजवळ ही घटना घडली. संतापलेल्या पतीने पत्नीचा मोबाईल फोन तोडला. यामुळे महिलेचा राग अनावर झाला आणि तिने पतीला १० मिनिटांत १५ हून अधिक वेळा कानशिलात लगावल्या. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनीही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती बराच वेळ पतीचे केस पकडून त्याला मारहाण करत होती. काहीनी ही महिला नशेत असल्याचे देखील म्हटले. 

व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

भर रस्त्यात सुरू असलेला हा ड्रामा पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला गेला, जो आता खूप व्हायरल होत आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने सांगितले की, त्यांचा प्रेमविवाह झाला होता. पतीने काही दिवसांपूर्वी ग्वाल्हेर आणि इंदूर येथे तिच्यासोबत मारहाण केली होती. त्यानेच तिला दारूही पाजली होती. दारमीन त्याने तिचा मोबाईल तोडल्याने ती प्रचंड संतापली. सदर कोतवालीचे प्रभारी अनुराग अवस्थी यांनी सांगितले की, या घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तक्रार आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Viral Video: High voltage drama on the road! Wife slaps husband in the ear, what started the argument?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.