हिमाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या विनाशकारी आपत्तीने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं. या नैसर्गिक आपत्तीने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली. याच दरम्यान एक अतिशय वेदनादायक आणि भावनिक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
११ महिन्यांची चिमुकली निकिताने या पुरात तिचे आईवडील आणि आजी यांना कायमचं गमावलं आहे. ती आता अनाथ झाली आहे. संपूर्ण कुटुंब पुरात वाहून गेलं फक्त निकिताच यामध्ये वाचली आहे. हे दृश्य पाहून सर्वांचं मन हेलावून गेलं आहे.
कठीणी काळात प्रशासनाने निकिताची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. एसडीएम स्मृतिका नेगी स्वतः या मुलीची काळजी घेत आहेत. मुलीला पालकांची कमतरता जाणवू नये म्हणून त्या तिला आईसारखे प्रेम देत आहेत.
पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
निकिताची आत्या तारा देवी देखील सध्या तिच्यासोबत आहे आणि तिची काळजी घेण्यात मदत करत आहे. कुटुंबातील सदस्यांच्या निधनाने तारा देवीला खूप मोठा धक्का बसला आहे, परंतु आता तिने निकिताला कधीही एकटे पडू देणार नाही असा निर्धार केला आहे.
प्रशासनाने निकिताला सर्व प्रकारची मदत करणार असल्याचं म्हटलं आहे. तिचं शिक्षण, उपचार, जेवण आणि राहण्याची पूर्ण व्यवस्था केली जात आहे. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आहे की, निकिताला चांगलं भविष्य देण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही.