शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

चीनच्या रॉकेट हल्ल्यात भारताच्या १५८ जवानांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' व्हायरल मेसेजमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 2:59 PM

सोशल मीडियावर फोटो व्हायरल; सिक्कीममध्ये चीननं भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा दावा

नवी दिल्ली: लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातला तणाव वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियामध्ये एक फोटो व्हायरल झाला आहे. चिनी सैन्यानं सिक्कीममध्ये भारतीय जवानांवर रॉकेट हल्ला केल्याचा दावा यामध्ये केला जात आहे. यामध्ये भारताचे १५८ जवान शहीद झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

उत्तर सिक्कीमच्या नाकू ला सेक्टरमध्ये चीन आणि भारताच्या जवानांमध्ये खडाखडी, सिक्कीममध्ये चीननं रॉकेट लॉन्चरनं केलेल्या हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलातल्या १५८ जणांचा मृत्यू अशा शीर्षकांसह सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाले आहेत. भारतीय माध्यमं ही बातमी लपवत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. 
लोकमतनं या फोटोची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोशल मीडियावर करण्यात येणारा दावा खोटा असल्याचं आढळून आलं. हा फोटो आत्ताचा नाही. तो तीन वर्षे जुना आहे. सिक्कीममध्ये चीननं भारतीय सैन्यावर कोणताही रॉकेट हल्ला केलेला नाही. रिव्हर्स इमेज सर्चचा वापर करून आम्ही व्हायरल फोटो नेमका कधीचा आहे, याबद्दलचा शोध घेतला. सध्या व्हायरल झालेला फोटो आणि त्यासारखेच आणखी काही फोटो जुलै २०१७ पासून पाकिस्तान आणि चीनच्या माध्यमांनी वापरले आहेत. २०१७ मध्ये डोक्लाममध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आलं होतं. त्यावेळीही पाकिस्तानमधल्या काही प्रसारमाध्यमांनी हाच फोटो वापरून चीनच्या हल्ल्यात १५८ भारतीय जवान मारले गेल्याचा दावा केला होता. त्यावेळी भारत आणि चीननं पाकिस्तानी माध्यमांनी दिलेलं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. व्हायरल फोटोंचा डोक्लामशी कोणताही संबंध नाही, हे त्यावेळीच भारतानं स्पष्ट केलं होतं. मे २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये मोर्टारचा स्फोट झाला होता. लष्करी तळावर झालेल्या स्फोटात एका जवानाचा मृत्यू झाला होता, तर सहा जण जखमी झाले होते. लष्करातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता व्हायरल झालेले फोटो हे त्याच अपघाताचे आहेत.  

टॅग्स :chinaचीन