शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विनोद तावडेंनी केली कमाल, चंढीगडमध्ये 'आप'ला धोबीपछाड देत भाजपचा महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 22:46 IST

भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे.

नवी दिल्ली - चंदीगड महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) ३५ पैकी १४ जागा जिंकून सगळ्यात मोठ्या पक्षाचे स्थान मिळवले तर भाजपला १२, काँग्रेसला ८ आणि एक जागा शिरोमणी अकाली दलाला जिंकता आली होती. महापौरपदासाठी पक्षाला १९ नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र, १९ नगरसेवकांचा पाठिंबा मिळविण्यात केजरीवाल यांच्या आपला यश मिळालं नाही. त्यामुळे, चंदीगडमध्ये सर्वात मोठा पक्ष असतानाही आम आदमी पक्षाचा महापौर झालाच नाही. येथे भाजप नेते विनोद तावडेंच्या प्रभारी नेतृत्वात भाजपचा महापौर बनला.

भारतीय जनता पक्षाने चंडीगड येथे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विनोद तावडे (Vinod Tawade) यांना नेमले आहे. तावडे यांच्या नेतृत्वात भाजपला निवडणुकीत यश मिळाले नसले तरी महापौरपदी भाजप नेत्याला बसविण्यात तावडेंनी यश मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महापौर निवडीचा परिणाम पंजाबच्या आगामी निवडणुकांवरही दिसेल, असेही ट्विटमध्ये तावडेंनी म्हटले आहे.  चंदीगड महापालिकेत १२ जागा जिंकणाऱ्या भाजपने आपल्या पक्षाचा महापौर बनविला आहे. भाजपच्या सरबजीत कौर चंदीगडच्या महापौर बनल्या आहेत. आम आदमी पक्षाचे एक मत बॅलेट पेपर फाटल्याने रद्द झाले होते. त्यामुळे, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर आपचे सर्वच नगरसेवक धरणे आंदोलनावर बसले होते. सिनीयर उपमहापौर पदाच्या खुर्चीवर भाजपच्या दिलीप शर्मा यांनी विजय मिळवला. एकूण २८ मतांपैकी भाजपच्या दिलीप शर्मा यांना १५ तर आम आदमी पक्षाच्या प्रेमलता यांना १३ मत मिळाली. दरम्यान, महापौर पदासाठी केवळ महिलांना अर्ज दाखल करता येत होता. कारण, पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ही जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

या निवडणुकीत काँग्रेसचे सात आणि अकाली दलाचा एक असे आठ नगरसेवक तटस्थ राहिले. निवडणुकीत काँग्रेसची कोंडी झाली. कारण भाजपला हरविण्यासाठी ते `आप`ला मतदान करू शकत नव्हते. भाजपचे तेरा नगरसेवक होते. पण तेथील भाजपच्या खासदार किरण खेर या महापालिकेच्याही सदस्य असतात, असा नियम भाजपने दाखवला. त्यामुळे भाजपला तेरा सदस्य निवडून आलेले असताना चौदा मते मिळाली

मतदारांनी काँग्रेसलाही नाकारले

चंदीगडमध्ये महापालिका निवडणुकंसाठी २४ डिसेंबरला मतदान झाले व ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या तुलनेत आपचे उमेदवार अनुभवी नव्हते तरीही मतदारांनी दोन्ही मोठ्या पक्षांना नाकारून ‘आप’वर विश्वास टाकला. विशेष म्हणजे भाजपचे महापौर रविकांत शर्मा यांचा या निवडणुकीत पराभव झाला. 

 

टॅग्स :AAPआपVinod Tawdeविनोद तावडेchandigarh-pcचंडीगढ़BJPभाजपाMayorमहापौर