नवी दिल्ली - मनी लाँड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) अटक केलेले विनेश चंदेल यांना दिल्ली येथील एका न्यायालयाने १० दिवसांची कोठडी सुनावली आहे. चंदेल हे राजकीय सल्लागार संस्था ऑय-पॅकचे संचालक आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना सोमवारी ‘ईडी’ने चंदेल यांना अटक केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
राज्यातील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी ‘ईडी’ने सोमवारी रात्री उशिरा चंदेल यांना अटक केली. त्यानंतर त्यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीचा युक्तिवाद मान्य केल्यानंतर न्यायालयाने चंदेल १० दिवसांची कोठडी मंजूर केली. हा तपास नोव्हेंबर २०२० मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे.
काय आहे प्रकरण?पश्चिम बंगालमधील आसनसोल परिसरातील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणींमधून कोळसा चोरी व तस्करी झाल्याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याची ‘ईडी’ने दखल घेत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी ८ जानेवारी रोजी ईडीने ऑय-पॅकच्या कार्यालयावर, तसेच संस्थापक व संचालकांपैकी एक असलेल्या प्रतीक जैन यांच्या कोलकाता येथील निवासस्थानावर छापे टाकले होते.
‘तृणमूल’ची चंदेल यांच्या सुटकेची मागणीविनेश चंदेल यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने केली. ही कारवाई म्हणजे निवडणूक प्रक्रियेतील घोटाळा असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी केला. या कारवाईत भाजपचा स्वार्थ असल्याचा दावा करत त्यांनी तपास संस्थेच्या कारवाईचा निषेध केला.
Web Summary : Vinesh Chandel, I-PAC director, arrested by ED in money laundering case linked to West Bengal coal scam, gets 10-day custody. Raids occurred earlier this year. Trinamool Congress demands his release, alleging political vendetta.
Web Summary : आई-पैक के निदेशक विनेश चंदेल को ईडी ने पश्चिम बंगाल कोयला घोटाले से जुड़े मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया, 10 दिन की हिरासत मिली। तृणमूल कांग्रेस ने उनकी रिहाई की मांग करते हुए राजनीतिक प्रतिशोध का आरोप लगाया।