शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

परीक्षा देतानाच झाला मृत्यू, निकाल पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 9:02 AM

मृत्यू कधी कोणाला जवळ करेल काही सांगता येत नाही, मात्र इच्छाशक्ती असली की माणूस कोणतंही ध्येय सहज गाठू शकतो. विनायक श्रीधर नावाचा विद्यार्थ्याचं स्वप्न अंतराळातील शोध घेण्याचं होतं.

नवी दिल्ली - मृत्यू कधी कोणाला जवळ करेल काही सांगता येत नाही, मात्र इच्छाशक्ती असली की माणूस कोणतंही ध्येय सहज गाठू शकतो. विनायक श्रीधर नावाचा विद्यार्थ्याचं स्वप्न अंतराळातील शोध घेण्याचं होतं. स्टीफन हॉकिंग हे त्याचा आवडता वैज्ञानिक होते. हे स्वप्न उराशी बाळगून विनायक  सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेमध्ये बसला. तीन पेपर दिल्यानंतर परीक्षेच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला. सीबीएसईचा निकाल लागल्यानंतर विनायकने दिलेल्या तीन पेपरमध्ये त्याला इंग्रजीमध्ये 100, विज्ञान 96 आणि संस्कृत या विषयामध्ये 97 गुण मिळाले यावरून विनायक बौद्धिक क्षमता किती होती याचा अंदाज लागलाच असेल. 

नोएडा येथील एमिटी स्कूलमध्ये विनायक श्रीधर शिक्षण घेत होता. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्याला ड्युशेन मस्क्युलर डायस्ट्राफी(डीएमडी) सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावं लागलं. या आजारामुळे शरीरातील मांसपेशी कमकुवत झाल्याने दिवसेंदिवस हा आजार भयंकर झाला. या सगळ्या संकटाला सामोर जात विनायकने जिद्दीने व्हिलचेअरवर बसून सामान्य मुलांप्रमाणे दहावीच्या परीक्षेला बसला. विनायकची आई ममता यांनी सांगितले की, त्याच्या मांसपेशी कमकुवत झाल्याने विनायकची हालचाल बंद झाली. त्यामुळे त्याला परीक्षेला बसून पेपर लिहिणंही कठीण होतं. तरीही सहाय्यकाच्या जोरावर विनायक परीक्षेला बसला. दोन पेपर झाल्यानंतर तिसरा संस्कृत पेपर विनायकने स्वत: लिहिण्याचे ठरवले. शारीरिक अपंगत्त्व आल्यानंतरही त्याला मात देण्याचा निश्चय विनायकने केला. विनायकच्या शरीराने त्याची साथ सोडली असली तरी त्याची बौद्धिक क्षमता प्रबळ होती. त्याची महत्त्वकांक्षा अफाट होती. वैज्ञानिक बनण्याचं त्याचं स्वप्न होतं. स्टीफन हॉकिंगप्रमाणे व्हिलचेअरवर बसूनही आधुनिक विज्ञानाला नवी दिशा देण्याचा मानस त्याने केला होता. 

मात्र परीक्षेच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला. तीन पेपर दिल्यानंतर इतर पेपरमध्ये त्याची अनुपस्थिती दाखविण्यात आली. दुर्दैवाने आज विनायक या जगात नाही. मात्र विनायक असतानाही त्याच्या कुटुंबीयांनी रामेश्वरमला जाण्याचं नियोजन केलं होतं. परीक्षा झाल्यानंतर विनायकची इच्छा रामेश्वरमला जाण्याची होती. आज विनायक नसला तरी त्याची इच्छा आम्ही पूर्ण करणार या हेतूने त्याच्या कुटुंबीयांनी रामेश्वरमला जाण्याचा निर्णय घेतला. विनायकचे वडिल जीएमआरमध्ये उपाध्यक्ष आहेत तर आई ममता या गृहिणी आहे. विनायकची संपूर्ण जबाबदारी आई समर्थपणे सांभाळत होती. सीबीएसईचा निकाल जाहीर झाला, मात्र विनायक नसल्याची खंत कायम आईला सतावत राहणार आहे.  

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाStephen Hawkingस्टीफन हॉकिंग