शहरं
Join us  
Trending Stories
1
सुपेकरांच्या अडचणीत वाढ; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला
2
"ही बघा पावती! मी हेक्टर देत होतो, पण त्यांनी फॉर्च्युनरच मागितली"; वैष्णवीच्या वडिलांनी सगळंच सांगितलं
3
"दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही...", जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद
4
क्रेडिट कार्डचे नियम, एलपीच्या किंमती...; १ जूनपासून हे ५ मोठे बदल होणार; तुमच्या खिशावर परिणाम होणार
5
Astro Tips: शुक्रवारी 'या' कुबेर मंत्राचा जप करा, दु:ख, दरीद्र्याला घरातून कायमचे घालवा!
6
पतीच्या मृत्यूनंतर दीरासोबत लावलं जातं लग्न; काय आहे 'करेवा विवाह'?, दिल्ली हायकोर्टासमोर पेच
7
शशांक, लता, करिश्माला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सासू, नणंदेचा लगेचच जामिनासाठी अर्ज
8
धक्कादायक! गर्लफ्रेंडचा नकार ऐकून बॉयफ्रेंडने कहरच केला, घरावर ग्रेनेड फेकला अन्... 
9
कुख्यात नक्षलवादी कुंजम हिडमाला पकडण्यात यश; AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त
10
 ५२ लाख रुपये मिळवण्याची हाव, पतीने मित्रांसोबत मिळून आखला भयानक कट, त्यानंतर...
11
"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर
12
वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले
13
ड्रॅगनची नवी खेळी, शाहबाज शरीफ अन् असीम मुनीरची झोप उडाली; चीनची पाकिस्तानात थेट एन्ट्री?
14
"युती सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मुंबई तुंबली; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?’’ काँग्रेसचा सवाल   
15
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंचे पुढे काय होते?
16
Maharashtra Politics : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं
17
सलग २ दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात 'उसळी'! इंडसइंड बँक चमकली, तुमच्या पोर्टफोलिओत काय झालं?
18
”वकीलसाहेब, वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका.." बाप ढसाढसा रडला...!
19
"राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक, २०२४-२५ मध्ये देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के मराहाराष्ट्रात’’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती 
20
अभिमानास्पद! ग्रामीण कला नेली सातासमुद्रापार; वयाच्या ९६ व्या वर्षी भीमव्वा यांना पद्मश्री पुरस्कार

'देश त्यांचा संघर्ष कधीही विसरू शकत नाही', PM मोदींची वीर सावरकरांना जयंतीनिमित्त आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 11:35 IST

Vinayak Damodar Savarkar Jayanti: 'देशासाठी त्यांचे बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही एक मार्गदर्शिका राहील.'

Vinayak Damodar Savarkar Jayanti: आज(28 मे) भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. देशाला ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी स्वातंत्र्य चळवळीतील तरुणांमध्ये एक अभुतपूर्व जोश संचारला होता. दरम्यान, आज त्यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. 

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?पंतप्रधान मोदी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, "भारतमातेचे खरे सुपुत्र वीर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. परकीय राजवटीने दिलेल्या कठोर यातनाही मातृभूमीप्रती त्यांच्या समर्पणाला धक्का लावू शकली नाही. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या अदम्य धैर्याची आणि संघर्षाची गाथा राष्ट्र कधीही विसरू शकत नाही. देशासाठी त्यांचे बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही एक मार्गदर्शिका राहील." 

या पोस्टसोबत पीएम मोदींनी सावरकरांबाबत त्यांचे विचार मांडणारा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

वीर सावरकरांबद्दल थोडक्यात माहितीसावरकरांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला. त्यांनी तरुणपणापासूनच ब्रिटीश राजवटीविरुद्ध रणशिंग फुंकले. सावरकरांनी लंडनमध्ये 'अभिनव भारत' आणि 'फ्री इंडिया सोसायटी' सारख्या संघटनांची स्थापना केली. त्यांनी भारतीय तरुणांना सशस्त्र क्रांतीसाठी प्रेरित केले. ब्रिटिशांनाही सावरकरांची इतकी भीती वाटायची की, त्यांनी सावरकरांना दोनवेळा काळ्यापाण्याची शिक्षा दिली होती. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला. तुरुंगातून बाहेर आल्यावरही सावरकरांनी ब्रिटिशांविरोधात आपला संघर्ष सुरुच ठेवला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर