Villagers protest at the LG Polymers project site | एलजी पॉलिमर्स प्रकल्पस्थळी गावकऱ्यांची निदर्शने

एलजी पॉलिमर्स प्रकल्पस्थळी गावकऱ्यांची निदर्शने

विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) : विषारी वाफेच्या गळतीमुळे वादाच्या भोवºयात सापडलेल्या एलजी पॉलिमर्सच्या आरआर वेंकटपुरम येथील प्रकल्पासमोर गावकऱ्यांनी शनिवारी तीव्र निदर्शने केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
हा प्रकल्प बंद करण्याची मागणी आंदोलक करीत होते.वाफ गळतीमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे दोन मृतदेह आंदोलकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवून जोरदार घोषणाबाजी केली. प्लास्टिकचे उत्पादन करणाºया या प्रकल्पातून स्टायरिन वाफेची गळती झाल्यामुळे गुरुवारी १२ जण मृत्युमुखी पडले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Villagers protest at the LG Polymers project site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.