शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा नेत्यांना ग्रामस्थांनी हाकलले

By बाळकृष्ण परब | Published: February 22, 2021 9:06 AM

Farmer protest News : एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला ग्रामस्थांनी केला तीव्र विरोधभाजपाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ खाप चौधरींची भेट घेण्यासाठी गावात आले होते. मात्र ग्रामस्थांनी वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली लावत त्यांची वाट अडवलीशिष्टमंडळामध्ये असलेले केंद्रीय मंत्री संजय बालियान यांचे समर्थक आणि स्थानिकांमध्ये झाली मोठ्या प्रमाणात वादावादी

शामली (उत्तर प्रदेश) - काही महिन्यांपूर्वी पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपाच्या (BJP) अडचणी आता वाढताना दिसत आहेत. (Farm Law) एकीकडे दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांकडून सुरू असलेले आंदोलन अधिकच तीव्र होत असताना दुसरीकडे केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनाही जागोजागी विरोधाचा सामना करावा लागत आहे. (Farmer protest ) उत्तर प्रदेशमधील शामली जिल्ह्याच्या (Uttar Pradesh) दौऱ्यावर गेलेल्या भाजपाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हाकलून दिल्याची घटना घडली आहे. यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी भाजपा मुर्दाबाद अशी घोषणाबाजीही केली. (villagers opposed the BJP leaders along with the Union Ministers Sanjay Balyan who had come to explain the benefits of the Farm law)Farmer protest भाजपाच्या नेत्यांचे हे शिष्टमंडळ खाप चौधरींची भेट घेण्यासाठी गावात आले होते. मात्र ग्रामस्थांनी वाटेत ट्रॅक्टर ट्रॉली लावत त्यांची वाट अडवली. त्यानंतर शिष्टमंडळामध्ये असलेले केंद्रीय मंत्री संजय बालियान यांचे समर्थक आणि स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. ही घटना शामली जिल्ह्यातील भैंसवाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळत असलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री संजय बालियान यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या मंत्री आणि नेत्यांचे एक शिष्टमंडळ बत्तीसा खापचे चौधरी बाबा सूरजमल यांच्यासोबत कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी आले होते. मात्र येथे येत असताना त्यांना शेतकऱ्यांकडून तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. गावात मंत्री येत असल्याचे कळताच ग्रामस्थांनी रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली लावून वाट अडवली. त्यानंतर मंत्री आणि शिष्टमंडळाने कसाबसा गावात प्रवेस केला. मात्र शेतकऱ्यांनी भाजपा मुर्दाबादची घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.या प्रकारानंतर मंत्री संजय बालियान यांचाही तोल सुटला. त्यांनी गाडीवर उभे राहत शेतकऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अशा दहा जणांनी विरोध केल्याने मुर्दाबाद होत नाही. दरम्यान, बुढियान खापचे बाबा सचिन कालखंडे, बाबा संजय कालखंड यांनी भाजपाच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला होता. त्यानंतर गठवाला खापचे बाबा हरिकिशन मलिक यांची भेट घेण्यासाठी ते भैंसवाला गावात पोहोचले होते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण