शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
4
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
5
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
6
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
7
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
8
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
9
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
10
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
11
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
12
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
13
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
15
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
16
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
19
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
20
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक

UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:19 IST

Vikas Yadav Marriage News: उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते आणि माजी खासदार डी. पी. यादव यांचा मुलगा विकास यादव याने हर्षिका यादव नावाच्या ३० वर्षीय तरुणीशी विवाह केला आहे. विकास यादव हा नितीश कटारा हत्या प्रकरणातला दोषी आरोपी असून, त्याला कारावासाची शिक्षा झालेली आहेत. ५२ वर्षीय विकास यादव आणि ३० वर्षांच्या हर्षिका यादव यांचा विवाह गाझियाबाद येथे पार पडला. 

उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते आणि माजी खासदार डी. पी. यादव यांचा मुलगा विकास यादव याने हर्षिका यादव नावाच्या ३० वर्षीय तरुणीशी विवाह केला आहे. विकास यादव हा नितीश कटारा हत्या प्रकरणातला दोषी आरोपी असून, त्याला कारावासाची शिक्षा झालेली आहेत. ५२ वर्षीय विकास यादव आणि ३० वर्षांच्या हर्षिका यादव यांचा विवाह गाझियाबाद येथे पार पडला. 

विकास यादव आणि त्याची पत्नी हर्षिका यांच्या वयामध्ये तब्बल २२ वर्षांचं अंतर आहे. दरम्यान, हर्षिका हिचे वडील सरकारी शिक्षक असून, ती उच्चशिक्षित आहे. तिने बीएसी, बीटीसी, एमएससी या पदव्या घेतल्या आहेत. त्याशिवाय तिने टेट परीक्षेतही पात्रता मिळवलेली आहे. ती सध्या इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून काम करत आहे. हर्षिका ही खूप विनम्र आणि साध्या स्वभावाची आहे, असे तिचे निकटवर्तीय सांगतात. 

तर दुसरीकडे तिचा पती विकास यादव हा गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचा आहे. तसेच माजी खासदार असलेले त्याचे वडील डी.पी. यादव हेसुद्धा उत्तर प्रदेशमधील बाहुबली नेते म्हणून ओळखले जातात. दरम्यान हर्षिका आणि विकास यांच्यातील विवाहाला राजकीय किनार असल्याचेही बोलले जात आहे. तसेच दोन्ही कुटुंबांनी हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्यावर भर दिला. हा विवाह सोहळा आर्य समाजाच्या परंपरेनुसार संपन्न झाला आणि त्याला कुटुंबीयांसह जवळचा मित्र परिवार उपस्थित होता, असे विकास यादवचे वडील डी. पी. यादव यांनी सांगितले. 

विकास यादव याला नितीश कटारा हत्या प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. २००२ साली झालेल्या या हत्याकांडाप्रकरणी न्यायालयाने विकास यादव, त्याचा चुलत भाऊ विशाल यादव यांना दोषी ठरवले होते. विकास यादवची बहीण भारती यादव हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधांतून ही हत्या झाली होती. या संबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता.  दरम्यान, २२ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली हायकोर्टाने आपल्याकडे जामीन वाढवून देण्याचे अधिकार नसल्याचे सांगत विकास यादव याचा अंतरिम जामीन वाढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर विकास यादव याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच आई आजारी असल्याचे कारण देत जामीन मिळवला  होता. या जामीनाचा अवधी आता एका आठवड्याने वाढवण्यात आला आहे.   

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी