शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

विकास दुबेचे दोन साथीदार एन्काऊंटरमध्ये ठार; विकासचा शोध सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 8:47 AM

कानपूर आणि इटावामध्ये एन्काऊंटर; विकासच्या दोन साथीदारांचा खात्मा

लखनऊ: कानपूर शूटआऊट प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेचे साथीदार रणबीर शुक्ला आणि प्रभात मिश्रा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारले गेले आहेत. प्रभात मिश्राला पोलिसांनी फरिदाबादमधील हॉटेलमधून ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला ठार केलं. विकासचा उजवा हात मानला जाणारा अमर दुबे याआधीच चकमकीत मारला गेला आहे.प्रभात मिश्राला पोलिसांनी बुधवारी फरिदाबादमधून अटक केली. त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. यानंतर त्याला कानपूरमध्ये नेलं जात होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरजवळ महामार्गावर भौंतीजवळ त्यानं एसटीएफच्या पोलीस निरीक्षकाचं पिस्तुल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला. कानपूरमध्ये आठ पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबे अजूनही फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. विविध ठिकाणी छापे टाकून विकासच्या साथीदारांना ताब्यात घेण्यात येत आहे. 'आठ पोलिसांना ठार करण्यात आलं, त्यावेळी आपण विकासच्या घरी होतो,' अशी विकासचा साथीदार असलेल्या प्रभातनं एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. पोलिसांना मारल्याचं दु:ख असल्याचं तो पुढे म्हणाला.विकास दुबेचा आणखी एक साथीदार रणबीरदेखील एन्काऊंटरमध्ये ठार झाला. त्याच्यावर ५० हजारांचं बक्षीस होतं. रणबीर इटावामध्ये मारला गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणबीर शुक्लानं रात्री उशिरा महेवाजवळील महामार्गावर स्विफ्ट डिझायर कारमध्ये लूटमार केली. त्याच्यासोबत आणखी तीन साथीदार होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काचुरा रोडवर रणबीरला घेरलं. पोलिसांनी घेरताच चकमक सुरू झाली. यामध्ये रणबीर मारला गेला. मात्र त्याच्यासोबत असलेले तीन जण पळून गेले. यानंतर इटावा पोलिसांनी शेजारील जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला. 

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबे