'जाट हूँ अंधभक्त नही', जेएनयूवरून बॉक्सर विजेंदर सिंहचा ट्रोलर्सला पंच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:12 PM2020-01-10T16:12:37+5:302020-01-10T16:14:20+5:30

विजेंदर तु बॉक्सिंगवरच लक्ष केंद्रीत कर, या बिनकामाच्या भानगडीत पडू नकोस. एक खेळाडू म्हणून तू आम्हाला आवडतोस, अस नेटकऱ्याने म्हटले होते.  

Vijender Has Befitting Reply After Trolls Attack His JNU Stand | 'जाट हूँ अंधभक्त नही', जेएनयूवरून बॉक्सर विजेंदर सिंहचा ट्रोलर्सला पंच

'जाट हूँ अंधभक्त नही', जेएनयूवरून बॉक्सर विजेंदर सिंहचा ट्रोलर्सला पंच

Next

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीने देशाचं राजकारण ढवळून निघाले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा सर्वच स्थरातून निषेध नोंदविण्यात आला आहे. बॉलिवूडमधील कलाकार यात आघाडीवर असताना बॉक्सर विजेंदर सिंह याने देखील निषेध नोंदवला होता. त्यावर त्याला एका चाहत्याने खेळाकडे लक्ष देण्याचा उपदेश दिला. त्याला विजेंदरने कडक शब्दात प्रत्युत्तर दिले. 

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर विजेंदरने आपलं मत व्यक्त केलं होतं.  जेव्हा तुम्ही चर्चेत जिंकता, तेंव्हा ते तुमच्यावर वैक्तीगत हल्ला करतात, असं ट्विट विजेंद्रने केलं होतं. त्यावर एका नेटकऱ्याने विजेंद्रला उपदेश देण्याचा प्रयत्न केला. विजेंदर तु बॉक्सिंगवरच लक्ष केंद्रीत कर, या बिनकामाच्या भानगडीत पडू नकोस. एक खेळाडू म्हणून तू आम्हाला आवडतोस, अस नेटकऱ्याने म्हटले होते.  

विजेंद्रने आपल्या खेळाप्रमाणे उपदेशाचे डोस पाजणाऱ्या नेटकऱ्याला आक्रमक उत्तर दिले. 'भाई जाट हूँ', अंधभक्त नही, असा टोला विजेंदरने लगावला. याआधी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने जेएनयूमधील विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. 
 

Web Title: Vijender Has Befitting Reply After Trolls Attack His JNU Stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.