शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

सरकारला घेरण्यात विरोधक घडविणार एकजुटीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 03:30 IST

मोदी सरकारच्या कारकिर्दीतले अखेरचे मान्सून अधिवेशन दिनांक १८ जुलैपासून सुरू होत आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : मोदी सरकारच्या कारकिर्दीतले अखेरचे मान्सून अधिवेशन दिनांक १८ जुलैपासून सुरू होत आहे. महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्याबरोबरच अधिकाधिक कामकाज कसे आटोपता येईल, याची सरकारला घाई आहे तर विरोधक विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. १0 आॅगस्ट पर्यंत चालणऱ्या हे अधिवेशन १८ कामकाजी दिवसांचे असेल.मान्सून अधिवेशनात विविध मुद्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी विरोधी पक्षांची बैठक विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या संसदेतील दालनात झाली. बैठकीत प्रामुख्याने राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी विरोधकांचा संयुक्त उमेदवार ठरवणे हा महत्त्वाचा मुद्दा चर्चेसाठी होता. याखेरीज बैठकीत बँकिंग क्षेत्रात वाढत चाललेले घोटाळे, काश्मीरची राज्यपाल राजवट, दहशतवादाचा प्रतिबंध, शेती व शेतकºयांच्या समस्या, दलितांवरील अत्याचार, पेट्रोल डिझेलच्या वाढत चाललेल्या किमती, सरकारचे परराष्ट्र धोरण, महिलांची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे आदी विषयांवर सरकारला घेरण्यासंबंधी संकेत प्राप्त झाले. पुढल्या वर्षी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, ही बाब लक्षात ठेवून मान्सून अधिवेशनात विरोधकांची एकजूट अभेद्य आहे व मोदी सरकारच्या विरोधात मतभेद विसरून सारे विरोधक एकत्र आले आहेत, याचे दर्शन देशाला घडवण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे.>लोकसभा अध्यक्षांनी बोलावली आज बैठकसंसदेचे पावसाळी अधिवेशन सुरळीत चालावे यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी मंगळवारी विविध राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कामकाजात कोणतेही अडथळे येऊ नयेत तसेच प्रलंबित विधेयके नीट चर्चा होऊन मंजूर व्हावीत, यासाठी सर्वच पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन महाजन करणार असल्याचे कळते. संसदेच्या ग्रंथालय इमारतीत होणाºया या बैठकीनंतर तिथेच अजून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाण्याची शक्यता असून ते विरोधीपक्षांच्या नेत्यांशी संवाद साधतील.>विधेयक की अध्यादेश?अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या गदारोळामुळे व सत्ताधाºयांच्या असहकार्यामुळे अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर होऊ शकली नव्हती. त्यानंतर सरकारला ६ विधेयकांबाबत अध्यादेश जारी करावे लागले होते.>या विधेयकांसाठी सरकार लावणार जोरसंसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२३ वे घटना दुरुस्ती विधेयक २0१७, तीन तलाक अधिकार व संरक्षण विधेयक २0१६, राष्ट्रीय मेडिकल आयोग विधेयक २0१७ बालकांसाठी निशुल्क व अनिवार्य शिक्षण दुरुस्ती विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करील.>निवडणुकीची तयारी : अन्य मागासवर्गिय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारे विधेयक अधिवेशनात मंजूर झाले तर देशभर अन्य मागासवर्गियांना मोठी शक्ती तर प्राप्त होईलच, याखेरीज मध्यप्रदेशच्या निवडणुकीत त्याचा राजकीय लाभ भाजपला मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी