Video : 'या' नेत्याची बहीण भावासाठी करत होती प्रचार, चोराने अंगठी हिसकावण्याचा केला प्रयत्न! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 12:53 IST2019-04-01T12:49:38+5:302019-04-01T12:53:01+5:30

सध्या देशभरात लोकसभा निवडणूक प्रचाराचा जोरदार जल्लोष बघायला मिळत आहे. अर्थातच या प्रचारावेळी वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येतात.

Video: YSR Jagan Mohan Reddy supporter tries to steal Sharmila's ring | Video : 'या' नेत्याची बहीण भावासाठी करत होती प्रचार, चोराने अंगठी हिसकावण्याचा केला प्रयत्न! 

Video : 'या' नेत्याची बहीण भावासाठी करत होती प्रचार, चोराने अंगठी हिसकावण्याचा केला प्रयत्न! 

सध्या देशभरात लोकसभा निवडणूक प्रचाराचा जोरदार जल्लोष बघायला मिळत आहे. अर्थातच या प्रचारावेळी वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येतात. अशीच एक विचित्र घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. घटना आहे आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील. एका रोड शो दरम्यान वायएसआर जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीसोबत एक विचित्र घटना घडली. खरंतर या घटनेवर हसूही येतं आणि लोकांच्या वागण्यावर चिंताही वाटते. 

रोड शोदरम्यान शर्मिला या गाडीतून जात होत्या. यावेळी त्या गाडीतून लोकांना हात दाखवत होत्या. त्यांनी हात गाडीबाहेर काढताच गर्दीतील एका व्यक्तीने त्यांची अंगठी काढून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ Koritepadu चा आहे. वायएसआर यांची बहिण शर्मिला भावासाठी प्रचार करत होत्या. पण इतक्यातच एका चोराने त्यांची अंगठी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. 


गर्दीतील एका व्यक्तीने शर्मिला यांची अंगठी काढण्यासाठी चांगलाच जोर लागला. पण शर्मिला यांनी वेळीच हाताला झटका दिला. त्यामुळे चोर अंगठी काढू शकला नाही. शर्मिला यांनी या घटनेची पोलिसात तक्रार तर दिली नाही. पण सद्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Web Title: Video: YSR Jagan Mohan Reddy supporter tries to steal Sharmila's ring