Video - अरेरे! भाजपा नेत्याला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहात पकडलं; पत्नीने भररस्त्यात चपलेने चोपलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 12:16 PM2022-08-22T12:16:53+5:302022-08-22T12:22:09+5:30

नेत्याला पकडल्यानंतर पत्नी आणि सासूने रस्त्याच्या मधोमध त्याला चप्पलने मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

video wife and in laws beat up bjp leader and his girlfriend with slippers in kanpur uttar pradesh | Video - अरेरे! भाजपा नेत्याला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहात पकडलं; पत्नीने भररस्त्यात चपलेने चोपलं

Video - अरेरे! भाजपा नेत्याला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहात पकडलं; पत्नीने भररस्त्यात चपलेने चोपलं

googlenewsNext

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका भाजपा नेत्याला महिलेसोबत कारमध्ये रंगेहात पकडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गर्लफ्रेंडसोबत रोमांस करणं चांगलंच महागात पडलं आहे. नेत्याला पकडल्यानंतर पत्नी आणि सासूने रस्त्याच्या मधोमध त्याला चपलेने मारहाण केली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित सोनकर असं या भाजपा नेत्याचं नाव असून ते भाजपाचे कानपूर-बुंदेलखंडचे प्रादेशिक मंत्री आहेत. 

मोहित सोनकर शनिवारी रात्री आनंदपुरी सोसायटीच्या कॅम्पसमध्ये भाजपाच्या एका महिला नेत्यासोबत कारमध्ये होता. घरच्यांना याची माहिती मिळाली. यानंतर पत्नी मोनी सोनकर आणि सासूसह काही नातेवाईकांनी या दोघांना कारमध्ये रंगेहात पकडले. मोहितला पत्नी आणि सासरच्या लोकांनी रस्त्याच्या मधोमध बेदम मारहाण केली. मोहित पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला पकडण्यात आले. 

मोहितला पत्नी जेव्हा मारहाण करत होती. त्याचवेळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि ते घटनास्थळी दाखल झाले. पण पत्नीला इतरा राग आला होती की ती पोलिसांसमोरच नेत्याला चपलेने मारत राहिली. मोहित सोबत सापडलेल्या महिला नेत्याने याबाबत बोलण्यास नकार दिला. पण मारहाणीत ती देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचा व्हि़डीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: video wife and in laws beat up bjp leader and his girlfriend with slippers in kanpur uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा