Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 02:52 PM2024-06-04T14:52:11+5:302024-06-04T15:22:28+5:30

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 Nilesh Lanke vs Sujay Vikhe: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात वारे बदलले आहेत. सुजय विखेंचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.

Ahmednagar Lok sabha Election Result: A big development in Ahmednagar! Sharad PAwar ncp Nilesh Lanke's winning lead; BJP's Sujay Vikhe's left counting center | Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय

Ahmednagar Lok sabha Election Result: अहमदनगरमध्ये मोठी घडामोड हाती येत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठे लीड घेतले असून मतदान मोजणी केंद्रावरून सुजय विखेंनी (Sujay Vikhe) काढता पाय घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात वारे बदलले आहेत. सुजय विखेंचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. मतदान केंद्रातून १३ व्या फेरीपर्यंतचेच आकडे पत्रकारांना देण्यात आले आहेत. यानंतरच्या फेऱ्यांचे आकडे पत्रकारांना देण्यात आलेले नाहीत. अशातच लंके जवळपास १३ व्या फेरीअखेर साडे तेरा हजार मतांनी आघाडीवर होते. 

अहमदनगरमध्ये आतापर्यंत २० फेऱ्या झाल्याचे समजते आहे. यामध्ये लंके यांनी ५७६३० मतांची आघाडी घेतल्याचे समजते आहे. पोलिसांनीही लोकमतला दिलेल्या माहितीनुसार लंके ५० ते ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

एक्झिट पोलचा अंदाज...
अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात येत होती. टीव्ही९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत. निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर  लंके यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली होती. 

Web Title: Ahmednagar Lok sabha Election Result: A big development in Ahmednagar! Sharad PAwar ncp Nilesh Lanke's winning lead; BJP's Sujay Vikhe's left counting center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.